‘द काश्मीर फाईल्स’ व्हल्गर चित्रपट… IFFIच्या परीक्षकांची टीका

‘द काश्मीर फाईल्स’ व्हल्गर चित्रपट… IFFIच्या परीक्षकांची टीका

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI) 2022 चे प्रमुख परिक्षक नदव लॅपिडने गोव्यात सुरु असलेल्या या चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला. खरंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या कचाट्यात सापडत आहे. परंतु तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होता. 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.

IFFI च्या परिक्षकांचा ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
सध्या गोव्यात सुरु असणारा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ चांगलाच चर्चेत आहे. या महोत्सवात अनेक भारतीय दिग्गज कलाकारांनी भेट दिली होती. या महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांना प्रमुख परिक्षक म्हणून होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर चांगलाच निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या महोत्सवातील 15 वा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आम्ही खूप निराश आहोत. आम्हाला वाटते की हा चित्रपट एका विशिष्ट विचारांचा प्रचार करणारा आणि असभ्य आहे. एवढ्या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला स्थान मिळणं चूकीचं आहे.

नदव लॅपिड यांचे या महोत्सवातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रींना ट्वीटरवर हा व्हिडीओ टॅग करत आपली प्रतिक्रिया देण्याची विनंती केली आहे.

 

 


हेही वाचा : 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशा पारेख यांनी वेस्टर्न कल्चरबाबत व्यक्त केलं दुःख

First Published on: November 29, 2022 9:06 AM
Exit mobile version