बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा डंका; पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा डंका; पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, अशातच प्रदर्शित होऊन पाच दिवस झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ने पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात चित्रपट करमुक्त

या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सर्वात पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी हा प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेशातही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

सत्यकथेवर आधारित चित्रपट

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


हेही वाचा :

महिलेने हात खेचल्याने गायक अरिजित सिंग जखमी

First Published on: May 10, 2023 10:53 AM
Exit mobile version