महिलेने हात खेचल्याने गायक अरिजित सिंग जखमी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग एका कॉन्सर्टदरम्यान जखमी झाला आहे. तो महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आपला लाईव्ह परफॉर्मन्स देत होता. त्यावेळी अचानक एका महिलेने त्याचा हात ओढला, त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

अरिजितचा व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रातील औरंगाबाद लाईव्ह परफॉर्मन्स करत होता. यावेळी प्रेक्षकांमधील एका महिला चाहती अरिजितशी त्याचा हात मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, अशातच त्याचा हात जोरात ओढला गेला आणि तो तोल जाऊन जखमी झाला. त्यानंतर अरिजित त्या महिलेशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तो तिला सांगतोय की, “तुम्ही मला ओढण्याचा प्रयत्न करत होता. कृपया स्टेजवर या आणि पाहा मला त्रास होत आहे. तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला विनाकारण दोष देत नाही. माझा हात खरंच दुखत आहे. तुम्ही इथे मला करायला आला आहात. काही हरकत नाही. पण जर मी परफॉर्म करु शकलो नाही तर तुम्हाला आनंद कसा मिळणार. तुम्ही मला असे खेचत आहेस, आता माझे हात थरथरत आहेत. मी सोडू का?” हे ऐकल्यानंतर महिलेने अरिजितची अनेक वेळा माफी मागितली.

चाहत्यांनी अरिजितचे केले कौतुक

हा व्हिडिओ समोर येताच चाहते अरिजितच्या या शांत वागण्याचं कौतुक करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, ‘ही घटना अतिशय लज्जास्पद होती.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘त्याने आपला संयम गमावला नाही, आणि अजूनही चांगल्या पद्धतीने समजावून सांगत आहे.’


हेही वाचा :

‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपट ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शत