छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट लवकरच

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट लवकरच

आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमित्ताचे अवचित्य साधून संभाजी महाराज्यांच्या ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ ह्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार लिखित छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ हा चित्रपट साकारला जाणार आहे. मल्हार पिक्चर्स प्रस्तुत वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपटामध्ये संभाजी महाराज्यांच्या शौर्याची गाथा दाखण्यात येणार आहे.

‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणातात की, “शंभूराजे खरे ‘युथ आयकॉन’ आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ मधून पूर्ण होतेय.”

थोर इतिहासकार आणि कादंबरीकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, “असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांच्या छावा. आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती ह्या सिनेमातून येईल, असा मला विश्वास आहे.”

संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत मल्हार पिक्चर्स प्रस्तुत ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 


हेही वाचा :केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

First Published on: May 14, 2022 11:37 AM
Exit mobile version