मुंबईतील हॅटमॅन किलरसोबत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचे कनेक्शन

मुंबईतील हॅटमॅन किलरसोबत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचे कनेक्शन

सध्या सोशल मीडियावर हॅटमॅन किलरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार मुंबईमध्ये एक हॅटमॅन किलर फिरत आहे. जो महिलांची हत्या करत आहे. ट्वीटरवर देखील #HatmanKillerInMumbai अश्या हॅशटॅगसोबत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे आता सर्वत्र खळबळ उडू लागली आहे. दरम्यान, आता हा नक्की काय प्रकार आहे? हा व्हिडीओ खरा आहे का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

व्हायरल व्हिडीओशी अभिनेता तुषार कपूरशी कनेक्शन
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओचे बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरसोबत काहीतरी कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर, तुषार कपूरचा आगामी चित्रपट ‘मारिच’चे प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तुषार कूपरने याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.


हेही वाचा :

बिपाशाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चिमुकलीचे घरी जोरदार स्वागत

First Published on: November 15, 2022 5:35 PM
Exit mobile version