Tiger 3 मधील सलमानचा लूक झाला लीक, भाईजानला ओळखणे झाले कठीण

Tiger 3 मधील सलमानचा लूक झाला लीक, भाईजानला ओळखणे झाले कठीण

Tiger 3 मधील सलमानचा लुक झाला लीक, भाईजानला ओळखणे झाले कठिण

भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या टायगर ३ (Tiger 3) या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच टायगर ३ ची संपूर्ण टीम शुटींगसाठी रशियाला रवाना झाली. रशियामध्ये सिनेमाचे शुटींग सुरू असताना सलमान खानचा सिनेमातील एक लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. (Tiger 3 Movie salman khan’s new Look leaked) सलमान खानचा हा नवा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. नव्या लुकमुळे सलमानला ओळखणे देखील कठीण झाले आहे. सध्या सिनेमातील सलमानचा नवीन लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर सलमान खान पॅन पेजवर टायगर ३ सिनेमातील काही शुटींग सीन्स शेअर करण्यात आले आहेत. ज्यात दबंग सलमान खानची एक खास झलक पहायला मिळत आहे. सिनेमातील हे फोटो एका कार चेंज सीक्वेंसचे असल्याचे सांगण्यात येत आहे. नेटकऱ्यांना सलमानचा हा आगळा वेगळा लूक पाहून धक्का बसलाय तर काहींनी ‘भाईजान कडक लूक ‘ म्हणत सलमानचे कौतुक देखील केले आहे.

टायगर ३ हा सिनेमा स्पाई थ्रिलर फ्रेंचाइसीचा तिसरा पार्ट आहे. याचा पहिला पार्ट २०१२मध्ये ‘एक था टायगर’ या सिनेमातून दाखवण्यात आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. त्यानंतर २०१७मध्ये ‘टायगर जिंदा है’ म्हणत पुन्हा एकदा सलमान खानने बॉक्स ऑफिसवर धूम ठोकली.  या दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यानंतर सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कलाकार सिनेमाच्या शुटींगसाठी रशियाला निघाले असताना विमानतळावर झालेला एक किस्सा सर्वांच्या लक्षात राहिला. सलमान खान आपली सिक्युरिटी घेऊन मुंबई विमानतळावर पोहचला असता त्याला CISF च्या जवानाने अडवले. ‘सलमान माझ्यासाठी कोणीही स्टार नाही. मी माझे काम करत आहे. सलमानची संपूर्ण झडती घेतल्याशिवाय त्याला आत एंट्री देता येणार नाही’,असे CISFच्या जवानाने म्हटले.

सलमानला अडवल्याने त्यांच्या फन्सनी आवाज उठवला मात्र सलमानने ‘त्याला त्याचे काम करुद्या’, असे म्हणत विषय संपवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. CISF च्या जवानाने घेतलेल्या भूमिकेचे नेटकऱ्यांनी प्रचंड कौतुक केले.


हेही वाचा – Bigg Boss OTT: शिल्पाकडून शमितासाठी रक्षाबंधनासाठी खास सप्राइज म्हणाली …

First Published on: August 23, 2021 3:19 PM
Exit mobile version