घरताज्या घडामोडीBigg Boss OTT: शिल्पाकडून शमितासाठी रक्षाबंधनासाठी खास सप्राइज म्हणाली ...

Bigg Boss OTT: शिल्पाकडून शमितासाठी रक्षाबंधनासाठी खास सप्राइज म्हणाली …

Subscribe

बिग बॉसच्या घरात राहायचे असेल तर चांगल खेळावं लागेल आपली भूमिका मांडावी लागेल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहिण शमिता शेट्टीने (Shamita Shetty) बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) घरात प्रवेश केला आहे. बहिण शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली आणि एकीकडे शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. शमिताला बिग बॉसच्या घरात जाऊन जवळपास दोन आठवडे झाले या काळात अनेक वेळा तिला राज कुंद्रावरुन टोमणे देखील मारल्याचे पहायला मिळाले. नुकताच रक्षाबंधानाचा सण होऊन गेला. या दिवशी शिल्पा शेट्टी काहीशी भावूक होताना दिसली. शिल्पा आणि शमिता दोघी बहिणी आहेत त्यांना भाऊ नाही. त्या दोघी एकमेकांना दरवर्षी राखी बांधतात. मात्र यंदा शिल्पा शेट्टी वेगळ्या संकटात आहे आणि रक्षाबंधनासाठी तिची बहिण देखील सोबत नाही. रक्षाबंधनानिमित्त शिल्पा शेट्टीने शमिताला बिग बॉसच्या घरात एक खास सरप्राइज दिलं. (Bigg Boss OTT: Special surprise from Rakshabandhan for Shamita from Shilpa)

- Advertisement -

बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांनी रक्षाबंधन साजरी केली. स्पर्धकांनी व्हिडिओ कॉलिंगवर कुटुंबियांची भेट घेतली. शमितासाठी देखील शिल्पाने एक खास व्हिडिओ पाठवला होता. जो पाहून शमिता अत्यंत भावूक झाली. बिग बॉसच्या घरात राहायचे असेल तर चांगल खेळावं लागेल आपली भूमिका मांडावी लागेल,असा सल्ला शिल्पाने शमिताला दिला. तर पुढे शिल्पाने आईची प्रकृती चांगली असून सर्व व्यवस्थित असल्याचे सांगितले.

- Advertisement -

बिग बॉसचा होस्ट करण जोहरशी बोलताना शमिता म्हणाली की, गेली २०-२५ वर्ष ती बहिणीसोबत आयुष्य जगत आहे. मी अधिक कॉन्फिडन्ट आहे कारण मला शिल्पा शेट्टीची बहिण म्हणून ओळखल जात. ती माझ्यासाठी एका प्रोटेक्टिव्ह शिल्ड सारखी आहे.


हेही वाचा – महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर, रुग्णालयातून डिस्चार्ज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -