रेमो डिसूजाच्या आगामी डांस सिनेमात टायगर-दिशा लावणार ठुमके ?

रेमो डिसूजाच्या आगामी डांस सिनेमात टायगर-दिशा लावणार ठुमके ?

रेमो डिसूजाच्या आगामी डाँस सिनेमात टायगर-दिशा लावणार ठुमके ?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी बॉलिवूडमध्ये डांस चित्रपटांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. ABCD,ABCD2,स्ट्रीट डाँसर सारख्या सिनेमानंतर आता रेमो डिसूजा एक नवा-कोरा डाँस सिनेमा बनवणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या सिनेमातील महत्वाची बाब अशी आहे की या सिनेमात बॉलिवूडमधील सगळ‌्यात मोठा डाँसिग स्टार अभिनेत टायगर श्रॉफ हा मुख्य भुमिका साकारतांना दिसणार आहे. तसेच आगामी काळात याची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे.अशातच अभिनेता टायगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा या दोघांनाही शनिवारी एकत्र पुजा फिल्मच्या कर्यालयात स्पॉट करण्यात आले. यावेळेस जॅकी भगनानी देखिल उपस्थित असल्याचे कळतेय. म्हणजेच सर्व प्लॅन आखण्यात आले आहे तसेच टायगर त्याचा जलवा पुन्हा पडद्यावर बरसवण्यास सज्ज होत आहे आणि जॅकी या चित्रपटाची निर्मीती करणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा बॉलिवुड मधिल टॉप कोरीयोग्राफरमध्ये त्यांची गणना होते. रेमोचं खरं नाव रमेश यादव आहे. डांसमध्ये करियर करण्यासाठी त्यांने शिक्षण पुर्ण केले नाहि. संर्घषाच्या काळातच त्याना लिजेल हिच्याशी विवाह केला होता कठीन काळातहि लिजेलने रेमोचा साथ कधीच सोडला नाही. रेमोच्या करियर बाबतीत सांगायचे झाल्यास त्याने एक नृत्या स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर त्याला आमिर खानच्या रंगिला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.तसेच यानंत सोनू निगमच्या दिवाना या अल्बम साँगला कोरियोग्राफ केले होते. आणि हा अल्बम तूफान लोकप्रिय झाला यानंतर रेमोने कधीच मागे वळून पाहिले नाही.


हे हि वाचा  मुंबईच्या पावसात कंगनाची घोडेस्वारी,पहा व्हिडिओ

First Published on: June 14, 2021 10:19 AM
Exit mobile version