Bollywood : ‘बाहुबली’ फेम प्रभासनंतर ‘या’ टॉलिवूड कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री

Bollywood : ‘बाहुबली’ फेम प्रभासनंतर ‘या’ टॉलिवूड कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री

Bollywood : 'बाहुबली' फेम प्रभासनंतर 'या' टॉलिवूड कलाकारांची बॉलिवूडमध्ये एंट्री

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे टॉलिवूड चित्रपटांचाही मोठ्या प्रमाणात बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. जसे चित्रपटप्रेमी हिंदी आणि मराठी सिनेमांचे चाहते आहेत. त्याचप्रमाणे साऊथ सिनेमांचा दर्जाही बॉलीवूड चित्रपटांपेक्षा जास्त आहे. याशिवाय टॉलिवूड सेलिब्रिटींचे अनेक चाहते देशभरात पाहायला मिळतात. बॉलीवूडमध्येही टॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात ठसा उमटवाय सुरुवात करत आहेत. दरम्यान, ‘बाहुबली’ फेम प्रभासनंतर आता प्रसिद्ध टॉलिवूड कलाकारांची बॉलीवूडमध्ये एंट्री होणार आहे.

प्रभासनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करून धमाल उडवली. आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बाकीच्या स्टार्सची बॉलीवूडमध्ये एंट्री होत आहे. जे लवकरच एका हिंदी चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे.

‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये पाहिल्यानंतर आता फिल्म पुष्पा सिनेमामध्ये सामंथा रुथ प्रभु आयटम सॉंगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता सामंथा आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूसोबत काम करताना पाहायला मिळत आहे. हा सिनेमा फीमेल सेंट्रीक असल्याची माहिती समोर येत आहे.

पुष्पाच्या जबरदस्त यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘स्पाय थ्रिलर मिशन मजनब’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हा साऊथचा हिट स्टार विजय देवरकोंडा याचा आगामी चित्रपट ‘लिगर’ आहे. त्याची पहिली झलक पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटाची मुख्य नायिका अनन्या पांडे असून, या चित्रपटाचा निर्माता करण जौहर आहे.

अभिनेता नागा चैतन्य मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटात तो ‘बाला’ची भूमिका साकारणार आहे.विशेष म्हणजे ही भूमिका नागाला आमिर खानने स्वतः फोनवरून ऑफर केली होती. नागा आमिरची ही ऑफर नाकारू शकला नाही.


हेही वाचा – Happy Lohri 2020 | PHOTO|…म्हणून लोहरीच्या दिवशी अग्नीत तीळ अर्पण करतात


 

First Published on: January 13, 2022 12:05 PM
Exit mobile version