मनोज वाजपेयीचा ओरिजनल फिल्म ‘सिर्फ एक बंदा काफी है’चा ट्रेलर प्रदर्शित

मनोज वाजपेयीचा ओरिजनल फिल्म ‘सिर्फ एक बंदा काफी है’चा ट्रेलर प्रदर्शित

भारतातील सर्वात मोठ्या स्वदेशी ओटीटी प्लॅटफॉर्मने, त्याच्या नवीनतम डायरेक्ट-टू-डिजीटल हा ओरिजनल फिल्म ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चा ट्रेलर रिलीज केला. सत्य घटनांनी प्रेरित, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित कोर्टरूम ड्रामा असून त्यात वकील पी.सी. सोलंकीच्या व्यक्तिरेखेत मनोज बाजपेयी झळकणार आहे. ही कथा एका सामान्य माणसाची आहे. उच्च न्यायालयातील एक वकील देशभर प्रस्थ असणाऱ्या देवावतारी म्हणवणाऱ्या बाबाविरुद्ध एक विलक्षण खटला लढवतो. या बाबावर POCSO कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या खटल्यात वकील एकहाती टक्कर देत यशस्वी होतो.

विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, झी स्टुडिओज आणि सुपर्ण एस वर्मा निर्मित, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा सर्वात भव्य कायदेशीर कोर्टरूम ड्रामा म्हणून ओळखला जातो. 23 मे 2023 रोजी ZEE5 वर विशेष प्रीमियर होईल. राष्ट्रीय आणि पद्म पुरस्कार प्राप्तकर्ता, मनोज बाजपेयी याची सायलेन्स.. कॅन यू हिअर ईट? आणि डायल 100’च्या यशानंतरची ZEE5 सोबत तिसरी ओटीटी ओरिजनल भागीदारी आहे.

ट्रेलरप्रमाणे, पी.सी. सोलंकी (मनोज बाजपेयी अभिनीत) त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा खटला लढवत असतो. एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी शक्तिशाली बाबा म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित अवतारी विरुद्ध त्यांचा लढा आहे. पी. सी. सोलंकी, त्याचे कुटुंबीय आणि प्रमुख साक्षीदारांना जीवे मारण्याच्या धमक्या असूनही, पी.सी. सोलंकी सत्याच्या लढ्यात चिकाटीने उभा राहतो. एका सामान्य माणसाची इच्छाशक्ती आणि स्वयंघोषित अवतारी यांच्यातील लढाई 5 वर्षे चालू राहते. जिथे पी. सी. सोलंकी देशातील काही नामवंत वकिलांशी लढा देतो. कोणताही धर्मगुरू कायद्याच्या वर नाही आणि सत्याचा विजय होतो हेच या खटल्याच्या शेवटी सिद्ध होते.


हेही वाचा :

एकदा हा चित्रपट सेंट्रल बोर्ड… शबाना आझमी यांनी केलं ‘द केरळ स्टोरी’चे समर्थन

First Published on: May 8, 2023 6:24 PM
Exit mobile version