माझा प्रवास सोप्पा नव्हता; धमक्या आल्या, आत्महत्या करावीशी वाटली!

माझा प्रवास सोप्पा नव्हता; धमक्या आल्या, आत्महत्या करावीशी वाटली!

प्रसिध्द गायक उदित नारायण यांनी या इंडस्ट्रीमध्ये ४० वर्षे पुर्ण केली. या निमित्ताने त्यांनी आपले युट्यूब चॅनेल सुरू केले. मात्र हा ४० वर्षांचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. या काळात त्यांनी २२ वर्ष धमक्या सहन केल्या, त्यामुळे अनेकवेळा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला अशी माहिती स्वत: उदित नारायण यांनी दिली.

त्यांना मुंबईत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. १९८० साली सहा- सात जणांसोबत एक रूम शेअर करून रहात होते. टॅलेंट असूनही त्यांना काम मिळाले नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. पण ‘कयामत से कयामत’ नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

उदित नारायण पुढे म्हणाले की, १९९८ मध्ये कुछ कुछ होता है यशस्वी झाल्यानंतर खंडणीसाठी धमक्यांचे फोन येऊ लागले. माझ्यामुळे ज्यांना असुरक्षित वाटत होते, अशा एका ग्रुपने तर माझी सुपारीच दिली. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने माझी खूप मदत केली. दोन- चार महिने धमक्यांचे फोन येत होते. शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी सारं सहन केलं. एका गाण्याचे मला १५ ते २० हजार मिळायचे. मी कधीच कोणाचं हिरावून घेतलं नाही, तरीही मला त्रास देणं सुरूच होतं.

अडचणी जास्त होत्या

‘एकूणच मला त्रास द्यायचा प्रयत्न होता, जेणेकरून मी चांगलं गाणं गाऊ शकणार नाही. सुरूवातीला मी खूप घाबरायचो, रडायचो, डिप्रेशनमध्ये गेलो. आत्महत्येचा विचार मनात आला. जगणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. संकटांचा सामना कधी लढून तर कधी मवाळ होऊन केला. पण संगीत रसिकांनी मला खूप प्रेम दिलं. जेवढं तुमचं ध्येय तेव्हा अडचणी जास्त.’असं उदित नारायण मुलाखतीत म्हणाले.


हे ही वाचा – धोकादायक! मोबाईलमधील ‘हे’ App करतायत हेरगिरी, त्वरीत काढून टाका!


 

First Published on: July 7, 2020 10:25 PM
Exit mobile version