तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायचंय… चित्रा वाघ यांना उर्फीचे ‘त्या’ घटनेवरून प्रत्युत्तर

तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायचंय… चित्रा वाघ यांना उर्फीचे ‘त्या’ घटनेवरून प्रत्युत्तर

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे.

मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान, सोमवारी चित्रा वाघ यांनी “मला तर ही उर्फट बाई कोण आहे हे माहीतही नाही, ज्या पध्दतीने नंगानाच सुरू आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबाड रंगवेन” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

उर्फीने दिलं प्रत्युत्तर


चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उर्फीने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत त्यात दिल्लीतील कंझावाला अपघातातील तरुणाचा व्हिडीओ शेअर केला असून चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. या पोस्टमध्ये उर्फीने लिहिलं की, “पोलिस एक अपघात म्हणून या प्रकरणाचा तपास करत होते. ते नराधम तिला 12 किलो मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले, तिची हाडं मोडली होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते. चित्रा वाघ या घटनेतील एक आरोपी तुमच्याच पक्षाशी संबंधित आहे. मला तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायला आवडेल,” असं उर्फीने म्हटलं आहे.

 


हेही वाचा :

उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून काय म्हणाल्या…

First Published on: January 3, 2023 9:53 AM
Exit mobile version