‘वंदे मातरम’च्या माध्यमातून रसिकांना सुगम आणि शास्त्रीय संगीताची पर्वणी

‘वंदे मातरम’च्या माध्यमातून रसिकांना सुगम आणि शास्त्रीय संगीताची पर्वणी

शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचा एकाच वेळी आस्वाद घेणं म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक वेगळाच आनंद असतो. एज्युकल स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे अविनाश धर्माधिकारी यांच्या संयोजन अंतर्गत विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले गीत वंदे मातरम यावर मैफिल आयोजित करण्यात आली होती. एकाच वेळी सुगम आणि शास्त्रीय अशा दोन्ही संगीतांचा आस्वाद या मैफलीत रसिकांनी घेतला.

हे ही वाचा – भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार पराग अळवणी, जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, अभिनेते सचिन खेडेकर, डॉ सुधीर निरगुडकर, श्रीधर फडके, मनोज नाथानी, अनिल गलगली उपस्थित होते. शब्द मल्हारचे निरुपणकार स्वानंद बेदरकर यांनी सुरुवातीला सांगितले की वंदे मातरम् हे गीत आज सर्वत्र गायलं जात असलं तरी ते पूर्ण गायलं जात नाही. त्याचं फक्त पाहिलंच कडवं गायलं होतं.

हे ही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची नागपूर एअरपोर्टवरील ग्रेट भेट

या मैफलीत संपूर्ण पाच कडव्यांचे वंदे मातरम गायले गेले आणि ते तीन वेगवेगळ्या चालींमध्ये ऐकविण्यात आले. गायनासोबतच वेगवेगळ्या वाद्यांचा अविष्कार सुद्धा रसिक प्रेक्षकांना पाहता, अनुभवता आला. देस रागाबरोबरच नव्या दोन रागांमध्ये दोन चाली ज्ञानेश्वर कासार यांनी या गीतासाठी रचल्या असून त्यांनीच
त्या आशिष रानडे यांच्या सोबत गेल्या सुद्धा आहेत. तर पं. सुभाष दसककर, अनिल दैठणकर, मोहन उपासनी, अनिल धुमाळ, उमेश खैरनार, ओंकार अपस्तंभ, ओंकार भुसारे यांनी संगीत साथ दिली. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. स्वानंद बेदरकर यांचे निरुपण खूपच अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी होते आणि रसिकांनी त्याला दाद सुद्धा दिली. आनंद मठ पासून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनाचा प्रवास व त्यात अनेकांच्या योगदानाचा उहापोह केलेला आहे.

हे ही वाचा –  शिवस्तुती नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

 

Edited  By – Nidhi Pednekar

First Published on: August 30, 2022 10:20 AM
Exit mobile version