Video: वरुण धवनने श्रद्धा कपूरच्या कानशिलात लगावली!

Video: वरुण धवनने श्रद्धा कपूरच्या कानशिलात लगावली!

Video: वरुण धवनने श्रद्धा कपूरच्या कानशिलात लगावली!

लवकरच बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्ट्रीट डांसर ३ डी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण अलीकडेच वरुण आणि श्रद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोघांमध्ये भांडण होताना दिसत आहे. एवढचं नाही तर श्रद्धा कपूर वरुणच्या कानाखाली मारताना दिसत आहे. त्यानंतर वरुण देखील श्रद्धाला कानाखाली मारताना दिसत आहे. वरुण आणि श्रद्धाच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय चाहते या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान या व्हिडिओमध्ये वरुण आणि श्रद्धा मज्जा मस्तीमध्ये एकमेकांना कानाखाली मारताना दिसत आहे. त्यानंतर दोघेही आपल्या चित्रपटाची प्रदर्शित तारीख चाहत्यांना सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वरुण आणि श्रद्धाची जोडी खूप जबरदस्त आणि क्युट दिसत आहे. सध्या वरुण आणि श्रद्धा ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत.

सोशल मीडियावर ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’च्या ट्रेलर चर्चेत आला आहे. याशिवाय चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. ‘गर्मी साँग’ असो किंवा ‘इल्लीगल वेपन २ ओ’ या गाण्यावर चाहत्यांना नाचण्यास भाग पाडलं आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासह प्रभू देवा, नोरा फतेही, सलमान खान, राघव जुयाल, धर्मेश येलांडे आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर वरुण धवन ‘कुली नंबर १’ या चित्रपटात सारा अली खान सोबत दिसणार आहे.


हेही वाचा – #JNUViolence बॉलिवूड कलाकारांनंतर मराठी कलाकारांनी केला निषेध


 

First Published on: January 8, 2020 5:35 PM
Exit mobile version