घरताज्या घडामोडी#JNUViolence बॉलिवूड कलाकारांनंतर मराठी कलाकारांनी केला निषेध

#JNUViolence बॉलिवूड कलाकारांनंतर मराठी कलाकारांनी केला निषेध

Subscribe

रविवारी रात्री दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात निषेध केला जात आहे. या निषेधात विद्यार्थी आणि सामान्य जनतेसह बॉलिवूडचे कलाकार देखील सहभागी होत आहे. आजपर्यंत आपण पाहिलं की बॉलिवूडचे कलाकार निषेध करत होते. मात्र आता मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून त्यांच्या निषेध नोंदवला आहे.

काय म्हणाला हेमंत ढोमे?

हेमेत ढोमेने असं ट्विट केलं आहे की, ‘शोर युँही ना परींदो ने मचाया होगा… कोई जंगल की तरफ ‘शहर’ से आया होगा!’ अशाप्रकारे कैफी आझमी यांचा शेर हेमंतने ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच त्याने ट्विट करताना #JNUViolence या हॅशटॅगचा वापर केला आहे.

- Advertisement -

सराकारच्या धोरणावर साधला निशाणा

‘आपल्या देशातील विद्यार्थ्यांचा बचाव करू शकत नाही आणि यांना दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचे आहे’, असं ट्विट करत सोनालीने सरकारच्या धोरणावर निशाणा साधला आहे. तसंच तिने #inrony या हॅशटॅगचा वापर ट्विट केलं आहे.

- Advertisement -

कवितेच्या माध्यमातून भावना केली व्यक्त

धुरळा चित्रपटाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने एक कविता पोस्ट करून जेएनयू घटनेचा निषेध केला आहे. ‘तू लाठी आण.. आम्ही हिंमत आणू, तू शिव्या आण.. आम्ही संयम आणू’, अशा शब्दांतील कवितेच्या माध्यमातून समीरने भावना व्यक्त केल्या आहेत.


हेही वाचा – #BoycottChhpaak ते #ISupportDeepika ट्विटरवर का होतंय ट्रेंड?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -