ज्येष्ठ तेलुगू संगीतकार राज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

ज्येष्ठ तेलुगू संगीतकार राज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

ज्येष्ठ तेलुगू संगीतकार राज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ६८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचं खरं नाव थोटकुरा सोमराजू असं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं ते अचानक खाली कोसळले आणि वॉशरुममध्ये पडले. ते प्रसिद्ध तेलुगू संगीतकार टीवी राजू यांचे सुपुत्र होते.

राज यांनी संगीतकार कोटी यांच्यासोबत एक टीम तयार केली होती आणि टॉलीवूडमधील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांची गाणी प्रचंड हिट आहेत. टॉलीवूडमधील सध्याच्या पिढीतील सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासारख्या गायकांसोबत अनेक वर्षे कीबोर्ड प्लेयर म्हणून कामं केली.

तोताकुरा सोमाराजू यांच्या अकाली निधनानं संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. राज यांनी कोटींसोबत १८० हून अधिक सिनेमांमध्ये गाण्यांचं लिखान केलं आहे. त्यातील काही गाणी गायिली देखील आहेत.’हॅलो ब्रदर’ या हिंदी चित्रपटासाठी 1994 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून नंदी पुरस्कार जिंकला, ज्यामध्ये नागार्जुन मुख्य भूमिकेत होता.

दरम्यान, राज यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक संगीतकार, चित्रपट निर्माते, गायक, गीतकार आणि संगीतकारांनी त्यांच्या निधनानं शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा : Instagram Down: रात्रीपासून इन्स्टाग्राम ठप्प; पोस्ट जातच नाही, लाखो युझर्सची तक्रार


 

First Published on: May 22, 2023 9:08 AM
Exit mobile version