घरदेश-विदेशInstagram Down: रात्रीपासून इन्स्टाग्राम ठप्प; पोस्ट जातच नाही, लाखो युझर्सची तक्रार

Instagram Down: रात्रीपासून इन्स्टाग्राम ठप्प; पोस्ट जातच नाही, लाखो युझर्सची तक्रार

Subscribe

जगभरातील अनेक Instagram Usersने Instagram Down असल्याची तक्रार केली आहे. काल रात्रीपासून एकही पोस्ट जात नसल्याच्या तक्रारी जगातील जवळपास 1 लाख 80 हजार युझर्सकडून करण्यात आल्या आहेत.

जगभरातील अनेक Instagram Usersने Instagram Down असल्याची तक्रार केली आहे. काल रात्रीपासून एकही पोस्ट जात नसल्याच्या तक्रारी जगातील जवळपास 1 लाख 80 हजार युझर्सकडून करण्यात आल्या आहेत. परंतु आता इन्स्टाग्रामची सुविधा सुरळित झाली आहे. ( Instagram Down Instagram down overnight Posts are not going complaints of millions of users )

युझर्सच्या सांगण्यानुसार, त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यास अडचणीत येत होत्या. त्यामुळे युजर्सना आधी नेटचा काही प्रॉब्लेम असल्यासारखं वाटलं. परंतु नेट सर्व्हिस मात्र सुरळित सुरु होती. इतर अॅपही व्यवस्थित चालू होते. फक्त इन्स्टाग्रामलाच प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे या युजर्सनी तत्काळ सोशल मीडियावरुन तक्रार करण्यास सुरुवात केली. इन्स्टाग्राम सर्व्हिस ठप्प होण्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेतल युजर्सना बसला आहे. Downdetector.com च्या नुसार अमेरिकेतील एक लाखाहून अधिक युझर्सने तक्रार केली आहे. तर ब्रिटनमधील 56 हजार आणि कॅनडातील 24 हजार युझर्सने रिपोर्ट केला आहे. परंतु आता मात्र इन्स्टाग्रामची सेवा सुरळित सुरु झाली आहे.

- Advertisement -

Downdetector.com नुसार, रविवारी एक लाख 80 हजार युझर्सने रिपोर्ट केलं आहे. मेटाच्या प्रवक्त्याने ही समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचं म्हटलं आहे. ग्राहकांना त्रास झाल्याबद्दल या प्रवक्त्याने युझर्सची माफीही मागितली आहे. कंपनीने आऊटेजवर अधिक विवरणाचा खुलासा केलेला नाही. मात्र, मेलचं उत्तर दिलं आहे.

( हेही वाचा: ₹ 2000 Note : नोटबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा, ठाकरे गटाची टीका )

- Advertisement -

याआधी अनेकदा Instagram झालंय Down

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेकदा डाऊन होत असत. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर युजर्सने रिपोर्ट केलं होतं. दरम्यान, भारतात तेव्हा इन्स्टाग्राम डाऊन झालं नव्हतं. फक्त 34 टक्के यूझर्सना लॉग इन कनेक्शनमध्ये समस्या येत होती. याआधी जानेवारीतही इन्टाग्राम डाऊन झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -