‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचे चित्रिकरण चक्क २० दिवसांत उरकलं!

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचे चित्रिकरण चक्क २० दिवसांत उरकलं!

'विक्की वेलिंगकर' चित्रपटाचे चित्रिकरण चक्क २० दिवसांत उरकलं!

काही दिवसांपूर्वी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचे टीजर लॉंच झाले असून, हा टीझर प्रेक्षकांच्या मनात फार कुतूहल निर्माण करणारा होता. तर २१ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विक्की वेलिंगकर हे तिच्या भूमिकेचं नाव असून तिचं पुस्तक आणि घड्याळाचे दुकान आहे. तर ट्रेलरमध्ये ती कोणापासून तरी पळताना दिसत आहे, पण ती कोणापासून, कशासाठी आणि किती वेळ पळणार आहे, याचं उत्तर तिच्याकडे नसून ती वेळेचं कोड सोडवण्याचं प्रयत्न करत आहे. ट्रेलरमध्ये पुढे एका ‘मास्क मॅन’ पासून पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

एखाद्या चित्रपटाची जेव्हा शूटिंग होते तेव्हा ती शूटिंग साधारणपणे काही महिने चालते. मात्र ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या दरम्यान सांगण्यात आले की हा चित्रपट शूट करण्यासाठी फक्त २० दिवस लागले होते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून, ‘विक्की नक्की का पळत आहे?’, ‘मास्क मॅन नक्की कोण आहे’ ‘वेळेचा नक्की काय खेळ आहे’ असे सगळे उत्कंठा वाढवणारे प्रश्न निर्माण होत आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळतील.

हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात सोनालीला साथ द्यायला मुख्य भूमिकेत स्पृहा जोशी देखील आहे. स्पृहानं विक्कीची मैत्रीण विद्याची भूमिका साकारली आहे. त्यासह चित्रपटात अभिनेता संग्राम समेळनं विक्कीच्या हॅकर मित्राची भूमिका केली आहे आणि अभिनेत्री रमा जोशी यांनी पबजी आजीची भूमिका साकारली आहे. या सह विनीता खरात, केतम सिंग, जुई पवार, गौरव मोरे हे सगळे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत. सौरभ वर्मा या चित्रपटाचे दिगर्दशक असून जीसिम्स, डान्सिंग शिवा प्रॉडक्शन आणि लोकीज स्टुडीओ हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हेही वाचा: शाहिद कपूर घेतोय ‘जर्सी’साठी जीवतोडून मेहनत

First Published on: November 21, 2019 6:26 PM
Exit mobile version