VIDEO : वाजिद खानने रुग्णालयात भावासाठी गायले होते शेवटचे गाणे

VIDEO : वाजिद खानने रुग्णालयात भावासाठी गायले होते शेवटचे गाणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकाराची जोडी साजिद – वाजिद यांच्यातील वाजीद खान यांचे निधन झाल्याची माहिती गायक सोनू निगम यांनी रविवारी मध्यरात्री दिली. वाजिद यांना किडनीचा आजार होता. त्यात कोरोनाची लागणही त्यांना झाली होती आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वाजिद खान यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला असून अनेक सेलिब्रेटींनी आपण भावूक झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर वाजिद खान यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाजिद खान रुग्णालयात बेडवर बसलेले दिसत आहे. ते म्हणतात की, ‘आपण एक गाण गाणार असून हे गाण आपला भाऊ साजिदसाठी समर्पित करत असल्याचे ते सुरुवातीला सांगत आहेत’. यावेळी वाजिद खान सुपरहिट ‘दबंग’ चित्रपटातील गाणं गातात. त्यांचं हे गाणं रुग्णालयातील इतर रुग्णदेखील ऐकून आनंद लुटत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पण दुर्दैवाने रुग्णालयातील हा व्हिडीओ वाजिद खान यांचा शेवटचा व्हिडीओ ठरला आहे.

सलमान खान यांच्या बहुतांश चित्रपटांना संगीत

बॉलीवूडमध्ये १९९८ साली आलेल्या प्यार किया तो डरना क्या चित्रपटातून त्यांनी संगीतकार जोडी म्हणून पदार्पण केले होते. त्यांनी अनेक हिट गाणी हिंदी सिनेसृष्टीत दिली आहे. सलमान खानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीतबद्ध केले आहे. गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पायेंगे, पार्टनर यातील गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी सारेगमप २०१२ आणि सारेगमप सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली होती.

संगीतकार जोडी साजिद-वाजिद

संगीतकार सलीम मर्चंट यांनी या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, वाजिद यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यांना किडनीचा विकार होता. याकरता काही दिवसांपूर्वी त्यांनी किडनी ट्रान्सप्लांटही केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यात इंफेक्शन झाल्याचे समजले. वाजिद यांना अखेरचे चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कालांतराने त्यांनी प्रकृती अजून खालावत गेली, अशी माहिती सलीम यांनी पीटीआयला दिली आहे.


हेही वाचा – संगीतकार वाजिद खान यांचे निधन


First Published on: June 1, 2020 3:38 PM
Exit mobile version