30 हजार सिने कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी यशराज फिल्मने मुख्यमंत्री ठाकरेंना केली मागणी

30 हजार सिने कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी यशराज फिल्मने मुख्यमंत्री ठाकरेंना केली मागणी

भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसची भीषण परिस्थिती पहायला मिळत आहे. अपुर्‍या बेड्स,ऑक्सिजन,औषधांच्या पुरवठ्या अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशातच महाराष्ट्र सरकारतर्फे अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे चित्रपट सृष्टीतील कामकाज पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी लोकांचे लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी यशराज फिल्मतर्फे  चित्रपटसृष्टीतील अधिकृत 30 हजार कर्मचार्‍यांचे निशुल्क लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यशराज फिल्मने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून लसीकरणसाठी मागणी करण्यात आली आहे. पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे की,” कोरोनामुळे  चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. लोकं खूप चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रपटसृष्टी सुरू होण्यासाठी तसेच  हजारो कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू होण्याकरिता त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी आम्हाला कोरोनाचे डोस खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संपूर्ण खर्च यशरज फिल्मतर्फे करण्यात येईल असं देखील लिहण्यात आले आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज(FWICE) ने सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 30 हजार कर्मचार्‍यांना लसीकरण केंद्राची व्यवस्था तसेच लसीचे डोस उपलबद्ध करून देण्याची मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज पत्रात लिहलं आहे की,” लसीकरण फक्त लोकांना आजारापासून लढण्यास नाही तर राज्याच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीला सुधारण्यात सुद्धा मदत करू शकते.


हे हि वाचा – कंगनाची टिव टिव बंद ! कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

First Published on: May 4, 2021 5:17 PM
Exit mobile version