अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं FB अकाऊंट दुसऱ्यांदा हॅक, पोस्ट लिहित केलं आवाहन

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं FB अकाऊंट दुसऱ्यांदा हॅक, पोस्ट लिहित केलं आवाहन

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचं FB अकाऊंट दुसऱ्यांदा हॅक, पोस्ट लिहित केलं आवाहन

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या फेसबुकवरुन त्यांचे फेसबुक हॅक झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. शुभांगी यांचे याआधी देखील फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. आता दुसऱ्यांदा त्यांचे अकाऊंट हॅक झाल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. ‘पुन्हा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे ती प्लिज ओपन करुन नका, हा ट्रॅप आहे यात अडकू नका’, असे आवाहन शुभांगी गोखले यांनी केले आहे.

शुभांगी गोखले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, ‘हा मेसेज गेले अनेक दिवस माझ्या फेसबुक मेसेंजरवर फिरत आहे. कृपया कोणीही तुम्हाला लिंक पाठवली तर ती ओपन करु नका. ही एक व्हायरस लिंक आहे. ती ओपन केल्यानंतर ही लिंक तुम्हाला फेक युट्यूब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेईन जाते. तिथे मेसेंजर सारखे पेज दिसते तिथे लॉन इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जात. हा ट्रॅप आहे यात अडकू नका’

शुभांगी गोखले यांनी केलेल्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना असे मेसेज आल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे. एका युझरने त्यांना शुभांगी गोखलेंकडून लिंक असलेल्या मेसेजच्या स्क्रिन शॉर्ट देखील शेअर केला आहे. शुभांगी यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या सांगण्यावरुन शुभांगी यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरुन हा त्यांच्या फ्रेंड्सना आवाहन करणारी ही पोस्ट शेअर केली आहे.

 

याआधी झालेत ‘या’ मराठी कलाकरांचे अकाऊंट हॅक

या आधी देखील अनेक मराठी कलाकारांचे फेसबुक तसेच इंन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीचे देखील इंन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंगडेचे देखील इन्स्ट्राग्राम अकाऊंट झाले होते. हॅकर्सनी तिच्या अकाऊंटवरून ४० हजार रुपयांची मागणी केली होती. बिग बॉस फेम अभिनेता ‘आरोह वेलणकर’चे देखील फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. आरोहचा मोर्फ व्हिडिओ करुन त्याला ब्लॅक मेल करण्यात आले होते.


हेही वाचा – Neha Pendse birthday: नेहा पेंडसे विषयीच्या ‘या’ ३ इंस्ट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

First Published on: November 29, 2021 9:00 AM
Exit mobile version