घरताज्या घडामोडीNeha Pendse birthday: नेहा पेंडसे विषयीच्या 'या' ३ इंस्ट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती...

Neha Pendse birthday: नेहा पेंडसे विषयीच्या ‘या’ ३ इंस्ट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Subscribe

मराठी मालिकांच्या छोट्या पडद्यावर आपले नाव कमावून नेहाने बॉलिवूड तसेच तमिळ तेलुगू सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली.

‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ आज तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईत झाला. लहानपणापासून नेहाला अभिनयाची आवड होती. मराठी मालिकांच्या छोट्या पडद्यावर आपले नाव कमावून नेहाने बॉलिवूड तसेच तमिळ तेलुगू सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. हिंदी टेलिव्हिजन शो ‘मे आई कमइन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ ची स्पर्धक म्हणून नेहा प्रसिद्ध झाली. नेहा पेंडसे एक अभिनेत्री म्हणून चर्चेत होतीच मात्र अनेकदा नेहाला ट्रोल देखील केलं गेलं होत. नेहा वाढदिवसानिमित्त जाणून घ्या नेहा विषयीच्या ३ इंस्ट्रेस्टिंग गोष्टी.

दोन मुलींचा बाप आहे नेहाचा नवरा

- Advertisement -

नेहा पेंडसे तिच्या लग्नानंतर सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरली होती. नेहा तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह यांच्या लग्नानंतर नेहाला जबरदस्त ट्रोल करण्यात आले होते. नेहा आणि शार्दुलने ५ जानेवारी २०२०मध्ये लग्न केलं.
नेहाचा नवरा शार्दुल सिंहचे हे तिसरे लग्न होते. नेहा ही शार्दुलची तिसरी बायको. शार्दुल दोन सुंदर मुली देखील आहेत. दोन मुलींना बाप असलेल्या शार्दुलसोबत लग्न केल्याने नेहा प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

जेव्हा नेहा म्हणाली होती ‘मी वर्जिन नाही’

- Advertisement -

नेहा पती शार्दुल सिंह सोबत लग्न केल्यानंतर ट्रोल झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने म्हटले होते की, ‘शार्दुलने माझ्यापासून काहीही लपवलेले नाही. मला त्याच्याविषयी आधीपासूनच माहिती होते. त्यामुळे मला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही. आयुष्य इथे संपलेले नाही शार्दुलने त्याचे आयुष्य व्यवस्थित बॅलेंस केलं आहे’.

नेहाने पुढे असे म्हटलं होतं की, ‘शार्दुलचे दोन विवाह झाले असतील, तर माझे देखील तीन वेळा ब्रेकअप झाले आहेत. मी पण कुठे वर्जिन आहे. माझ्याबाबतीत तर लग्नापर्यंत गोष्टी पोहचल्यावर मुलगा गायब झाला होता. या सगळ्या ब्रेकअप्सने मला स्ट्रॉग बनवले’.

नेहा बनली निर्माती

अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठी, हिंदी,तेलुगू,तमिळ,मल्याळम भाषेतील सिनेमा तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. ‘भाग्यलक्ष्मी’, ‘नटसम्राट’ सारख्या मालिका सिनेमांनंतर त्याचप्रमाणे हिंदीत ‘भाभीजे घर पर है’, ‘मे आय कम इन मॅडम’ सारख्या सुपरहिट मालिकानंतर नेहा आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नेहाने निर्मिती केलाला रावसाहेब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे.


हेही वाचा – नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेननसोबत मारलेल्या गप्पा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -