Video: हनी सिंग इज कम बॅक; चाहत्यांसाठी खास पार्टी साँग

Video: हनी सिंग इज कम बॅक; चाहत्यांसाठी खास पार्टी साँग

Video: हनी सिंग इज कम बॅक; चाहत्यांसाठी खास पार्टी साँग

रॅपर आणि बॉलिवूडचा लोकप्रिय गायक हनी सिंग नेहमीच त्यांच्या रॅप साँगमुळे चर्चेत असतो. खूप दिवसांनंतर हनी सिंगचे नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. यो यो हनी सिंगचे ‘लोका’ हे गाणं काल प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं संगीत खूप जबरदस्त आहे. त्यामुळे हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या गाण्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यो यो हनी सिंगचं ‘लोका’ गाण्याला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. टी-सीरीजने आपल्या युट्युब पेजवर हे गाणं प्रदर्शित केलं आहे. हे गाणं हनी सिंग सोबत सिमर कौरने गायलं आहे.

यापूर्वी हनी सिंगचं प्रदर्शित झालेले ‘मखना’ हे गाणं चांगलं चर्चेत आलं होत. ‘मखना’ या गाण्यावरून हनी सिंगला पंजाब महिला आयोगाने नोटीस बजावली होती. हनीच्या या ‘मखना’ गाण्यातून महिलांच्या चरित्राबद्दल अपमान केल्याचा दावा पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी केला होता. गाण्यांमधून महिलांप्रती अवमान केल्याचा नेहमीच त्याच्यावर आरोप होत असतो. हनी सिंगचं ‘मखना’ हे नवं गाणं बऱ्याच दिवसांनंतर प्रदर्शित झाले होत. परंतु, या गाण्यामुळे हनी सिंग अडचणीत पुन्हा एकदा अडचणीत आला होता.


हेही वाचा – प्रमोशनसाठी काही पण! मन फकीराच्या टीमचे अनोखे प्रमोशन


 

First Published on: March 3, 2020 12:21 PM
Exit mobile version