Zareen Khan भावूक! म्हणाली सलमान माझ्या चांगला मित्र, पण मी त्याच्यावर ओझे म्हणून राहू शकत नाही

Zareen Khan भावूक! म्हणाली सलमान माझ्या चांगला मित्र, पण मी त्याच्यावर ओझे म्हणून राहू शकत नाही

Zareen Khan भावूक! म्हणाली सलमान माझ्या चांगला मित्र, पण मी त्याच्यावर ओझे म्हणून राहू शकत नाही

अभिनेत्री जरीन खान ( Zareen Khan ) अभिनेत्री म्हणून पडद्यावर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. वीर या सिनेमातून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. असे म्हणतात की सलमान सोबत करिअरला सुरुवात केलेल्या अभिनेत्रींचे भविष्य उजळते पण जरीनच्या बाबतीत असे झाले नाही. सलमान खानच्या सिनेमा काम केले असले तरी जरीन पुढे बॉलिवूडमध्ये फारशी काम मिळाली नाहीत. मात्र अनेक वर्षानंतर जरीनने सलमानविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जरीन म्हणाली, माझे वडील गेल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा माझ्या मदतीला आणि मार्गदर्शन करायला कोणीही नव्हते. त्यामुळे घाबरुन कोणाशीही बोलायचे नाही. मला खूप अँटीट्यूट आहे असे लोकांना वाटायते. मी सिनेमात चांगल्या भूमिका करू इच्छत होते मात्र मला कोणीही संधी दिली नाही. तेव्हा सलमानने मला मदत केली.

जरीन पुढे म्हटले की, सलमान माझा फार चांगला मित्र आहे. परंतु मला त्याच्या पाठीवरचं ओझ बनायचे नाही. सलमान नेहमी मला आर्थिक मदत करतो. त्यासाठी सलमानचे मी वेळोवेळी आभार मानते. माझा संघर्ष हा मी या सिनेसृष्टीत आल्यापासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सलमान मला मदत करतोय. मी या इंडस्ट्रीमध्ये सुखी आहे. मला इथे कोणत्याही शर्यतीत भाग घ्यायचा नाही.

जरीन पुढे म्हणाली, लोक मला अजूनही विचारतात सलमान तुला मदत करतो का? मी इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून सलमानने माझी मदत केलीय. मला पहिला सिनेमा देखील सलमानमुळे मिळाला. सलमानने माझ्या आयुष्यात मला मोलाची साथ दिली आहे त्यामुळे त्याचे आभार मानायला मी कधीच विसरत नाही. सलमान फार चांगला माणूस आहे.त्याच्या कामात तो सतत व्यस्त असतो. पण मला माझ्या लहान सहान गोष्टींसाठी सलमान आणि त्यांच्या भावांच्या पाठिवरचे माकड बनायचे नाहीये. जरीन पुढे म्हणाली,मी आज जे काही काम करतेय ते सलमानमुळे करतेय. तो माझी मदत करतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी त्याला आयुष्याभर त्रास देईल. जरीन सलमान विषयी बोलताना फार भावूक झाली होती.


हेही वाचा –  कडाक्याच्या थंडीत Janhvi Kapoor ने पाण्यात लावली आग! बिकनीत केलं हॉट फोटोशूट

First Published on: January 20, 2022 5:08 PM
Exit mobile version