धारावीतील जॉबहबच्या मानकरी..

धारावीतील जॉबहबच्या मानकरी..

महानगरच्या दिवाळी अंकाकरिता घेतलेल्या मुलाखतीवेळी नीला सत्यनारायण यांच्या मनातील धारावीचा विकास उलगडून दाखवला होता. धारवीकडे कोणी वाईट म्हणून तिला वाळीत टाकू नये, तिला हिणवू नये, तिला दुर्लक्षू नये म्हणून नीला सत्यनारायण दुसरीकडे प्रयत्न करीत होत्या.
मुंबईच्या बकाल अवस्थेला या शहरात असलेल्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्या कारणीभूत आहेत, असा आक्षेप घेत तत्कालीन अबकारी विभागाचे मंत्री गणेश नाईक यांनी या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे जमिनीचा लिलाव करावा असा प्रस्ताव ठेवला होता. या झोपडपट्ट्यांच्या जमिनींचा लिलाव करून त्या जागांवर एका बिल्डिंगमध्ये झोपडपट्ट्यातील रहिवाशांना वसवायचे आणि उर्वरित बिल्डींग यासंबंधित लिलाव धारकाला कायमस्वरूपी देण्याच्या मोबदल्यात राज्याच्या तिजोरीत निधी प्राप्त करून घ्यायचा. या निधीतून राज्यावर असलेले सुमारे चार लाख कोटींचे कर्ज फेडावे असा हा नाईकांचा प्रस्ताव होता. राज्यावरील वाढतं कर्ज कमी किंबहुना कर्जमुक्त करण्यासाठीचा हा प्रस्ताव तसा सडेतोड होता. झोपडपट्टीने व्याालेली जमीन सोडवून घेणे विविध कारणामुळे अशक्य असल्याने त्या जमिनीतून निधी प्राप्त कारण हा नाईकांचा उद्देश होता. या प्रस्तावावर तेव्हा प्रचंड टीका झाली प्रस्ताव योग्य की अयोग्य या संदर्भातले वाद विवाद इतके गाजले की यामुळे मुंबईच्या झोपडपट्ट्यांचे काय होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेषतः धारावी सारख्या झोपडपट्टीचा असा विकास झाला तर लोक चांगल्या घरात राहतील पण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटेल या विवंचनेने ज्येष्ठ सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण कासावीस झाल्या. अतिशय स्लम असलेली धारावी देशाला चांगला हातभार लावू शकते, या झोपडपट्ट्या चांगली कमाई देऊ शकतात, देशाला आधार देऊ शकतात, शहराला मोठे व करू शकतात असा प्रस्ताव देत पहिला प्रस्ताव त्यांनी धारावी या आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी साठी ठेवला. धारावीतील कष्टकऱ्यांच्या मेहनतीची त्यांना जाणीव होती. त्यांच्या कष्टावर सत्यनारायण यांचा विश्वास होता. लहान घरात असलेला उद्योग अधिक चांगला फुलवता येऊ शकतो हे त्या जाणून होत्या. या विश्वासाच्या जोरावर कोटीत त्यांनी एक एका घरात असलेल्या पंधरा पंधरा जणांच्या गटाला समृद्ध होण्याचा मंत्र दिला आणि प्रत्येक घरात उभा उद्योग भरभराटीला येईल, हे त्यांनी पटवून दिलं. धारावीतील या लोकांनी सत्यनारायण यांच्या प्रयत्नाला विश्वासाची जोड दिली. अतिशय गरिबीत असलेल्या या मंडळींना सरकारच्या विविध योजनांमधून कर्ज उत्पन्न करून देऊन त्यांची आर्थिक विवंचना काही अंशी कमी केली. चामड्याच्या उद्योग या वस्तीमध्ये मोठा हातभार देऊ शकेल हे पटवून दिले. आज धारावीमध्ये महिन्याकाठी सुमारे शंभर कोटीची उलाढाल होते या उलाढालीचे सर्वात मोठे श्रेय हे नीला सत्यनारायण यांना जातं. आज या झोपडपट्टीमध्ये सात लाखांची लोकसंख्या असली तरी ते सगळे लोक जवळपास या उद्योगांमध्ये सहभागी आहेत. इतकंच नव्हे तर ही झोपडपट्टी नवी जॉबहब बनली आहे. या उद्योगाच्या माध्यमातून देशाला सुमारे दीड हजार कोटींचं चलन प्राप्त होतं. अशा या धारावीला कोरोनाने ग्रासलं असल्याची माहिती मिळताच नीला सत्यनारायण अत्यंत दुखी झाल्या होत्या. तिथल्या लोकांनी अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने आपला उद्योग चालू राहावा यासाठी खूप मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आज कोरोनाचं झालेलं उच्चाटन म्हणता येईल. सत्यनारायण यांनी जीव ओतलेली धारावी कोरोनामुक्तीकडे कुच करत असताना हे चांगले पाहायचे भाग्य सत्यनारायण याना मिळू नये, हा दैवदुर्विलास…

First Published on: July 16, 2020 11:56 AM
Exit mobile version