Maruti Cars : मारुती कारसाठी मोठी सवलीतीची ऑफर, ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची सुवर्णसंधी

Maruti Cars : मारुती कारसाठी मोठी सवलीतीची ऑफर, ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची सुवर्णसंधी

नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारतीय कंपनी निर्मात्यांनी आपल्या मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत. भारताची सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने घोषणा केली असून जानेवारीपासून कारच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. तसेच कारचे नवीन रेट लागू करण्यात आले आहेत. परंतु याच महिन्यामध्ये कंपनीने स्वत किंमतीत कारची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांना खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण ही ऑफर फक्त जानेवारीच्या ३१ तारखेपर्यंतच लागू असणार आहे.

मारूती ऑल्टो ८००

मारूती सुझुकी ऑल्टो ८०० कार जानेवारी महिन्यात आणि ऑफर पूर्वी खरेदी केली असता ग्राहकांना ३३ हजार रूपयांचा फायदा होणार आहे. त्यामध्ये १० हजार रूपयांची सूट देण्यात आली असून एक्सचेंज बोनस ३ हजार रूपये कॉर्पोरेट डिस्काऊंट दिलं जाणार आहे. कारच्या सीएनजी व्हेरियंटवर म्हणजेच पेट्रोलवर कोणत्याही प्रकारचं कॅश डिस्काऊंट देण्यात आलेलं नाहीये.

मारूत सुझुकी एस-प्रेसो

जानेवारी २०२२ मध्ये एस-प्रेसोच्या पेट्रोल आणि सीएनजी BS6 प्रकारांवर ३३ हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यामध्ये पेट्रोलसाठी १५ हजार रुपयांची सूट आणि १५ हजार एक्सचेंज बोनस (पेट्रोल) आणि ३हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा देखील समावेश आहे. मारूती सेलेरियावर यंदाच्या वर्षात १३ हजार रूपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला १० हजार रूपयांचं एक्सचेंज बोनस ऑफर आणि ३ हजार रूपयांपर्यंत कॉर्पोरेटवर सूट मिळणार आहे.

मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीच्या विक्रीत मोठी घट झाली होती. तसेच हुंदाईला देखील नुकसानीचा मोठा फटका बसला होता. परंतु टाटा मोटर्सच्या कारमधील विक्रीत वाढ झाली होती. डिसेंबर महिन्यामध्ये मारूती सुझुकी इंडियाने १ लाख ५३ हजार १४९ इतक्या कारची विक्री केली आहे.


हेही वाचा : Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे आभार, म्हणाला…


 

First Published on: January 10, 2022 9:17 PM
Exit mobile version