आकाशाला गवसणी घालण्याची संधी!

आकाशाला गवसणी घालण्याची संधी!

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जेव्हा ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये आले तेव्हा त्यांनी मी केलेले प्रयोग आणि बदल सोबत फिरून पाहिले. ४५ मिनिटांच्या संवादानंतर अतिशय प्रेमळपणे मृदू आवाजात सर्व विद्यार्थ्यांसमोर माझी पाठ थोपटली व भाषणातदेखील माझा पूर्ण नावानिशी उल्लेख केला होता. देशभरातून आयआयटी लेव्हलचे क्रीम विद्यार्थ्यांना त्यांनी एक शिक्षक राष्ट्र निर्माण करण्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे सांगितले. ‘ओन्ली नॉलेज विथ इट्स अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅड विल पॉवर कॅन मेक इंडिया सुपर पॉवर! अ‍ॅन्ड द नेक्स्ट वॉर विल बी ओन्ली विथ नॉलेज अ‍ॅन्ड नॉन विथ मसल ऑर मनी!’ असे माझ्या खांद्यावर हात ठेवत एपीजे म्हणाले होते.

पुढे ‘प्रज्ञानम् ब्रम्ह’ हेच ब्रीद घेऊन मी ट्रिपल आयटी अलाहाबादचा लोगो डिझाईन केला. मला रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणि हा लोगो आजही ट्रिपल आयटी अलाहाबादची जागतिक ओळख बनत वापरला जात आहे. भारताची भावी हायटेक जनरेशन म्हणजे विद्यार्थी, मी आणि एपीजे असे एकत्र कितीतरी क्लिक झालेले फोटो आजही ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये आहेत. भूतकाळाच्या फोटोंच्या प्रकाशातून बाहेर पडत आठवणीतील ‘फ्लॅशबॅक’ संपत नव्या वर्तमानाची जाणीव मला झाली. डोळे उघडले तेव्हा पुढचा विचार होता तो फक्त प्रामाणिकपणे ही नवी जबाबदारी पार पाडण्याचा!

१. पुढच्या क्षणी चौघांना एकत्रित आपापल्या फाईल घेऊन केबिनमध्ये मी बोलावले. फाईल न पाहता त्यांना त्या बाहेर ठेवण्यास सांगितले. प्रश्नार्थक चेहर्‍याने कोणीच काही न बोलता चौघे जण फाईल बाहेर ठेवून केबिनमध्ये पुन्हा हजर झाले.

२. त्यानंतर मी खिशातून १० रुपयांच्या ४ कोर्‍या करकरीत नोटा काढून टेबलावर ठेवल्यात. कोणीही एकमेकांशी न बोलता ३० मिनिटांत प्रत्येकाने एक वडापाव आणून थेट माझ्या केबिनमध्ये टेबलवर ठेवून पुन्हा बाहेर वेटिंग रूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे आणि जाताना फोन, बॅग रिसेप्शन काऊंटरवर लॉकरमध्ये जमा करून फक्त चावी सोबत घेऊन वेगवेगळ्या दिशेला परस्परांशी न बोलता जायचे असे नियम सांगितले.

३. कोणीही काहीही न विचारता प्रश्नार्थक नजरेने वडापाव आणण्यासाठी सर्व निघून गेले.

४. बरोबर २० मिनिटांत पहिला उमेदवार आला. टेबलावर माझ्यापुढे बरोबर १० रुपयाला मिळणारा वडापाव आणि २ पूर्ण तळलेल्या मिरच्या समोर ठेवत काही न बोलता तो बाहेर निघून गेला.

५. दुसरा उमेदवार हसत त्यानंतर ५ मिनिटांनी केबिनमध्ये आला. स्वतःच्या खिशातले ५ रुपये टाकून एक १५ रुपयांचा वडापाव, ४ मिरच्या आणि केशरी रंगाची चटणीची कागदी प्लेट टेबलावर ठेवून गेला.

६. तिसर्‍या उमेदवाराने वडापाव आणि भज्यांचे दोन पॅकेट सोबत आणले होते. त्याने एक प्लेट भजी आणि वडापाव या दोघांच्या मध्ये ठेवली आणि भज्याचे एक पाकीट घेऊन तो केबिनच्या बाहेर जाऊन बसला.

७. चौथा उमेदवार अर्धा तास होऊनदेखील अद्याप परतला नव्हता. साधारणपणे ४५ मिनिटांनी त्याने केबिनमध्ये येऊन १० रुपयांची नोट व त्याचबरोबर घडी करून आणलेला एक कागदही ठेवला. कदाचित आपल्या कृतीचे स्पष्टीकरण देण्यासाठी तो काहीतरी बोलणार होता, पण त्याने स्वत:ला आवरले आणि तोही काहीच न बोलता बाहेर जाऊन बसला.

८. ५ मिनिटांनंतर चौघांना एकत्र केबिनमध्ये बोलावले आणि ६० सेकंदात आपला अनुभव सांगायला सांगितला. अनुभव सांगून झाल्यानंतर ते केबिनमधून परत वेटिंग रूममध्ये गेले.

९. बरोबर १.५९ वाजता माझा मित्र केबिनमध्ये आला. प्रिंट काढलेले कागद मी त्याच्याकडे सुपूर्द केले. त्याने त्यावर नजर फिरविली. घड्याळाने दोन टोल दिले. मी उठून ‘अंगरखा’ काढला. कोट आता खुर्चीला चढविला होता.

१०. मित्र आता पुन्हा जरनल मॅनेजरच्या खुर्चीवर बसला. एकही प्रश्न न विचारता त्याने खिशातून चकाकणारे सोनेरी पेन काढले. सह्या करीत चौघा उमेदवारांच्या चैतन्यमयी जीवनाच्या ‘परवान्या’वर आणि माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

११. आम्ही दोघे केबिनमधून बाहेर आलो. यावेळी मित्राने स्वत:चा कोटदेखील केबिनमध्ये काढून ठेवला होता.

१२. चौघांना ‘लेटर’ देण्याचा मान मित्राने मला दिला. ड्युटी (कर्तव्य), रेस्पॉसिंबिलिटी (जबाबदारी), अकाऊंटीबिलिटी (उत्तरदायित्व), चेकलिस्ट ते पूर्ण करण्याची डेडलाईन, दररोजच्या कामाचा तपशील आणि फिडबॅक सिस्टमची माहिती, प्रक्रियाचे पहिले पान होते आणि त्याखाली अपॉईंटमेंट लेटर होते.

१३. उत्साही व वेळेत काम करणार्‍या, आज्ञाधारक आणि काहीशा सांगकाम्या यांच्या मधल्या अवस्थेतील उमेदवाराला क्लेरिकल विंग, दुसर्‍याला खूश ठेवण्यासाठी व्ह्यॅल्यू अ‍ॅडिशन करणारा, प्रसंगी स्वतःच्या खिशाला झळा देणारा बोलक्या स्वभावाचा दुसरा उमेदवार पब्लिक रिलेशन आणि मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये होता.

१४. तिसरा उमेदवार केबिनमधून बाहेर गेला तेव्हा तो चौथा उमेदवार येण्याची वाट बघत थांबला होता. मधल्या ५ मिनिटांच्या कालावधीत त्याने सर्वांना आपल्या मोठ्या पाकिटातून भज्याची ४ पाकिटे बाहेर काढून हातात देताना तसेच आधार देतानाचे दृश्य ‘कॅमेरा’ टिपत होता. तो आयटी प्रोजेक्ट टीम लीडर झाला होता.

१५. चौथा उमेदवार प्रामाणिक होता. नोट परत करताना वड्यासाठी वापरले जाणारे तेल कसे खराब आहे आणि वडा खाऊन आरोग्याला त्रास होऊ शकतो हे मोजक्या शब्दांत कागदावर लिहीत चांगले वडे आणण्यासाठी अजून वेळ त्याने मागितला होता. रिस्क होती तरी गुणवत्तेशी तडजोड करायला तयार नव्हता. शोधवृत्ती पाहता रिसर्च, डेव्हलपमेंट अँड क्वालिटी कंट्रोल आणि सिस्टम इम्प्रुव्हमेंट अशी जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली. कंपनीच्या ध्येयधोरणांची गुणवत्ता राखण्यासाठी धडपडणारा उमेदवार गमावणे म्हणजे कंपनीचे नुकसान होते.

हास्य आणि ढगफुटी!

१६. एव्हाना वडापाव, भजी, कंपनीचा चहा-नाश्ता समोर आला. वातावरण आल्हाददायक होते. एसीचा गारवा भर उन्हातदेखील जाणवत होता, पण मिरच्या न खाताच चारही उमेदवारांच्या डोळ्यांतून ‘ढगफुटी’ झाली होती. सुयोग्य व अपेक्षेपेक्षा जास्त पगार मिळण्याचा आनंद उमेदवारांच्या डोळ्यांत होता. सोबत मोकळ्या आकाशाला गवसणी घालण्याची अमर्याद संधीही तरुण पंखांना मिळाली होती.

१७. चारही सेनापती आपल्या मोहिमेला गेले तेव्हा मधल्या वेळात अपॉईंटमेंट लेटर बनविण्याचे काम संपवून मी वेटिंग रूममध्ये चक्कर मारत होतो. मी बाहेर पडलो तेव्हा ट्रिपल आयटी अलाहाबादमध्ये माझ्या प्रत्येक वर्गात आणि लॅबमध्ये लावली होती अगदी हुबेहूब तशीच पाटी आता भिंतीवर ‘खुलली’ होती – हास्य आणि हसण्यावर बंदी नाही!

लिटमस

स्पॅनिश फिजिशियन अर्नाल्डस डी व्हिला नोव्हा यांनी सुमारे १३०० मध्ये प्रथमच लिटमसचा वापर केला. लिटमसचा मुख्य उपयोग म्हणजे एखादा पदार्थ आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी हे तपासणे होय. भौतिकशास्त्राचे आणि एरोडायनॅमिक्सचे नियम वापरत पुढच्या मिनिटातच शंभर नव्हे तर एक हजार टक्के अचूक हवामानाची माहिती देणे आज जगभर शक्य आहे, मात्र ‘ब्लॅक होल’ पेक्षाही गूढ, मनाचा थांग गाठत, मानवी भाव-भावना, इगो, कॅरेक्टर, बिहेवियर, लॉयल्टी आदींसाठी अशा पुस्तकात जागा नाही. मी घेतलेल्या अशा ‘टेस्ट’ योग्य आहेत की नाही याबद्दल मतमतांतरे असू शकतील. सर्वत्र सरधोपटपणे वापरता येईल असे तर मुळीच नाही हेदेखील महत्त्वाचे, मात्र स्वप्नवत वाटावा असा हा खराखुरा स्वानुभव म्हणजे जस्ट एक सॅम्पल-दी रियल स्टोरी ऑफ ‘लिटमस वडापाव’!

(लेखल विज्ञान तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

First Published on: December 18, 2022 4:00 AM
Exit mobile version