Akshaya Tritiya 2023 : वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा ‘हे’ उपाय

Akshaya Tritiya 2023 : वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा ‘हे’ उपाय

हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. तसेच या दिवशी अनेकजण आवर्जून सोने-चांदी खरेदी करतात.

अनेकजण या शुभ दिवशी लग्न, साखरपुडा, गृह प्रवेश, खरेदी देखील करतात. जेणेकरुन त्यांना यश मिळते. त्याच वेळी, असे देखील मानले जाते की, जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमचे आणि तुमच्या जोडीदाराशी मतभेद असतील तर या दिवशी तुम्ही काही खास उपाय करून तुमचे वैवाहिक जीवन सुखमय करु शकता.

वैवाहिक जीवन सुखमय अक्षय्य तृतीयेला करा ‘हे’ उपाय

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पती-पत्नीने मंदिरात जाऊन एकत्र महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करावी. तसेच यावेळी रुद्राभिषेक देखील करावा आणि सुखी वैवाहिक जीवनाची कामना करावी. तसेच ‘ओम गौरी शंकराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यावेळी पती-पत्नीने रेशमी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करा.

देवीला सोळा श्रृंगार दान करा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शिव-पार्वती मंदिरात पूजेनंतर देवी पार्वतील सोळा श्रृंगार दान करा. शिवाय यावेळी महिलांनी देखील सोळा श्रृंगार करावा.

 


हेही वाचा :

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? हे आहे कारण

First Published on: April 17, 2023 5:00 PM
Exit mobile version