Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?

Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?

Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?

कलेचा देवता आपला साऱ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे सगळीकडे आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. लाडक्या बाप्पाच्या पाहुणचारात काही कमी पडू नये यासाठी सर्वजण सज्ज झालेत. मात्र १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. मोदकांचा अर्थ आनंद देणारा पदार्थ असंही म्हटलं जातं. मोदक हे ज्ञानाचं प्रतिक देखील मानलं जातं. त्यामुळे ज्ञानाची देवता असणाऱ्या गणपती बाप्पांना हा नैवद्य जास्त आवडतो. त्यामुळे आपल्या घरी किंवा सार्वजिनक मंडळांत बाप्पाचा पाहुणचार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. पण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देण्यामागचे कारण काय? असा प्रश्न अनेकदा पडतो.

Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?

लाडक्या गणरायाला नैवेद्य म्हणून मोदक देण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. गणपती बाप्पांशी परशुरामाने युद्ध पुकारले होते. या युद्दादरम्यान बाप्पांचा एक दात तुटतो. दात तुटल्य़ाने बाप्पांना काही खाताना अडचण येत होती. त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. यावेळी अनेक देवी देवतांनी गणरायाला खाण्यासाठी काय देता येईल याचा विचार केला. यावेळी त्यांच्यासाठी मोदक हा पदार्थ तयार करण्यात करण्याची युक्ती सुचली. कारण मोदक खाताना बाप्पांना त्रासही होणार नाही. त्यामुळे तो आरामात खाऊ शकत होतो.

Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?

याशिवाय मोदक गोड असल्याने त्याचा गोडवा कायम राहतो. हा मोदकाचा स्वाद बाप्पांना देखील फारच आवडला आणि त्यांचं मन आनंदून गेलं. त्यानंतर गणरायाला मोदक अधिक प्रिय झाले. अशी मोदकांच्या मागची दंतकथा सांगितली जाते. ‘मोद’ म्हणजे आनंद देणारे. मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते, मन आनंदी होते. शास्त्रानुसार, गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे.


अर्जेंटीनात जगातील सर्वात मोठ्या ४ फुटाच्या उंदरांचा सुळसुळाट


 

First Published on: September 6, 2021 3:04 PM
Exit mobile version