Hanuman jayanti 2023 : आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या श्री हनुमानांनी का केले 3 विवाह? ही आहे कथा

Hanuman jayanti 2023 : आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या श्री हनुमानांनी का केले 3 विवाह? ही आहे कथा

हिंदू पुराणांनुसार, चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे. ज्याप्रकारे श्रीरामांना विष्णू अवतार मानले जाते. त्याचप्रकारे श्री हनुमानांना शिव अवतार मानले जाते. असं म्हणतात की, श्री हनुमान भगवान शंकराचे अकरावे अवतार होते. तसेच त्यांनी आपले संपूर्ण जीवन ब्रह्मचर्याचे पालन करुन श्रीरामांची सेवा करण्यात घालवले. मात्र, काही पौराणिक ग्रंथांनुसार, श्री हनुमानांचे विवाह झाले होते. आज आम्ही तुम्हाला श्री हनुमानांच्या 3 विवाहांची रंजक कथा सांगणार आहोत.

श्री हनुमानांचे झाले होते 3 विवाह

या सर्व गोष्टी विविध धर्मग्रंथानुसार सांगितल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या परिस्थिती त्यांना समोर आलेल्या परिस्थीतीनुसार विवाह करावा लागला. मात्र, 3 विवाह होऊनही हनुमान विवाहित जीवन जगले नाही आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. श्री हनुमानांनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करुन श्री रामांची सेवा केली.

हनुमानांचा पहिला विवाह सूर्य पुत्री सुवर्णचला हिच्यासोबत झाला होता. पराशर संहितेत हनुमानजी हे सूर्यदेवाचे शिष्य होते असा उल्लेख आहे. सूर्यदेवाला हनुमानजींना नऊ विद्यांचे ज्ञान द्यायचे होते. या नऊपैकी पाच विद्या हनुमानजी यांनी अवगत केल्या, पण बाकीच्या 4 विद्या शिकण्यासाठी लग्न करणे अनिवार्य होते. त्यामुळे सूर्यदेवाने आपल्या मुलीचे लग्न हनुमानजींशी लावून दिले. मात्र, हनुमानजींशी विवाह झाल्यानंतर सुवर्णचला कायम तपश्चर्येत मग्न झाली आणि हनुमानजींनी आपल्या 4 विद्या अवगत केल्या. ज्यामुळे त्यांचे ब्रह्मचर्य अबाधित राहिले.

पौम चरितानुसार, रावण आणि वरुण देव यांच्यातील युद्धात वरुण देवाच्या बाजूने हनुमानजींनी रावणाशी युद्ध केले, या युद्धात रावणाचा पराभव झाला. युद्धात पराभूत झाल्यानंतर रावणाने आपली सून अनंगकुसुमाचा विवाह हनुमानाशी केला होता.

पौम चरितानुसार, ज्यावेळी वरुण देव आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा वरुण देवाच्या बाजूने युद्ध करणाऱ्या हनुमानजींनी वरुण देवाला विजय मिळवून दिला . या विजयाने प्रसन्न होऊन वरुण देवाने आपली कन्या सत्यवतीचा विवाह हनुमानजीशी करून दिला. लग्नानंतरही हनुमानजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले.

दरम्यान, श्री हनुमानांचा विवाह झाला होता याची माहिती अनेकांना नाही. परंतु आंध्र प्रदेशातील एक मंदिरात श्री हनुमानांचे त्यांची पत्नी सुर्वचलासोबत मूर्ती स्थापित आहे. जे त्यांच्या विवाहाचे एकमेव प्रतीक आहे.


हेही वाचा :

Hanuman jayanti 2023 : अंजनीपुत्र मारुतीचे नाव ‘हनुमान’ कसे पडले? वाचा ही रंजक कथा

First Published on: April 5, 2023 1:42 PM
Exit mobile version