Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर भक्ती Hanuman jayanti 2023 : अंजनीपुत्र मारुतीचे नाव 'हनुमान' कसे पडले? वाचा ही...

Hanuman jayanti 2023 : अंजनीपुत्र मारुतीचे नाव ‘हनुमान’ कसे पडले? वाचा ही रंजक कथा

Subscribe

हिंदू पुराणांनुसार, चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे.ज्याप्रकारे श्रीरामांना विष्णू अवतार मानले जाते. त्याचप्रकारे श्री हनुमानांना शिव अवतार मानले जाते. असं म्हणतात की, श्री हनुमान भगवान शंकराचे अकरावे अवतार होते.

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांच्या 108 नामांचा जप केल्याने भय, दुःख आणि दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे. बजरंगबलीचे सर्वात प्रसिद्ध नाव हनुमान आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? भगवान हनुमानांचे हे नाव कसे पडले.

मारुतीचे नाव हनुमान कसे पडले?

- Advertisement -

When Hanuman wanted the sun - Katha Kids

पौराणिक कथेनुसार, श्री हनुमानांचे मूळ नाव मारुती आहे. त्यांच्या आई-वडीलांनी लहानपणी त्यांचे नाव मारुती ठेवले होते. मारुती लहानपणापासूनच खूप शक्तिशाली होते. लहानपणी झोपेतून उठल्यावर त्यांना खूप भूक लागली. त्यांना झाडाच्या आड दूरवर एक लालरस गोळा दिसला. त्यांना तो लालसर गोळा फळ आहे असं वाटलं. मात्र, ते फळ नसून साक्षात सूर्यदेव होते. आपली भूक भागवण्यासाठी मारुती सूर्याच्या दिशेने गेले आणि त्यांना सूर्यदेवांना गिळले. सूर्याला गिळल्यामुळे संपूर्ण जगात अंधार झाला.

- Advertisement -

सूर्याला गिळंकृत केल्यावर ब्रह्मांड अंधारात बुडाले, ज्यामुळे देवांपासून मानवापर्यंत सर्वजण अस्वस्थ झाले. तेव्हा सर्व देवांनी मारुतींना सूर्याला बाहेर काढण्याची विनंती केली, पण त्यांनी आपल्या हट्टीपणात कोणाचेही ऐकले नाही. शेवटी इंद्रदेवांनी आपला मारुतींच्या हनुवर म्हणजेच हनुवटीला आपल्या व्रजाने मारले, त्यामुळे हनुमानांचा हनुभंग झाला. त्यामुळे त्यांना ‘हनुमान’ हे नाव पडले.

 


हेही वाचा :

Hanuman jayanti 2023 : हनुमानाला ‘पवनपुत्र’ का म्हटलं जातं? जाणून घ्या जन्माचे रहस्य

- Advertisment -