22 की 23 ऑक्टोबर नक्की कधी आहे धनत्रयोदशी? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहू्र्त

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून सुरु होणार असून 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर रोजी साजरी करणं शुभ मानलं जाईल.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त
धनत्रयोदशी प्रारंभ – 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून
धनत्रयोदशी समाप्त – 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपर्यंत
धनत्रयोदशी पूजन शुभ मुहूर्त – 23 ऑक्टोबर रोजी, रविवारी संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून ते 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत
प्रदोष काळ – संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून ते 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत

धनतेरस बनतोय शुभ योग


23 ऑक्टोबर रोजी शनी देव मार्गी होत आहेत. अशामध्ये अनेक राशींना त्याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय धनतेरसच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि सिद्धी योग करणार आहे.

धनत्रयोदशीचे महत्व
धनतेरसला अनेकजण धनत्रयोदशी म्हणून देखील ओळखतात. शास्त्रानुसार, समुद्र मंथनावेळी धनतेरसच्या दिवशी कुबेर, देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवशी या तिघांची पूजा केली जाते. यासोबत नवीन वस्तू खरेदी केल्या जातात.


हेही वाचा :

दिवाळीची साफ-सफाई करताना चुकूनही घराबाहेर काढू नका ‘या’ वस्तू; नाहीतर देवी लक्ष्मी होतील नाराज

First Published on: October 13, 2022 5:16 PM
Exit mobile version