यंदाची गणेश जयंती का आहे खास? ‘या’ उपायांनी पूर्ण करा सर्व मनोकामना

यंदाची गणेश जयंती का आहे खास? ‘या’ उपायांनी पूर्ण करा सर्व मनोकामना

प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात की, जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदा 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. तसेच या दिवशी बुधवार असल्याने गणेश जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी काही खास उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल.

गणेश जयंती तिथी

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 24 जानेवारी, मंगळवारी दुपारी 3:22 पासून सुरु होणार असून 25 जानेवारी, बुधवार दुपारी 12: 34 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, 25 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, 25 जानेवारी रोजी शुभ मुहूर्त सकाळी 11:29 पासून दुपारी 12:34 पर्यंत असेल.

माघी गणेश जयंतीला करा ‘हे’ उपाय

‘या’ दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याचे महत्त्व
अग्नि पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.


हेही वाचा :

माघी गणेश जयंतीला असणार ‘हे’ 3 शुभ योग; जाणून घ्या मुहूर्त

First Published on: January 24, 2023 3:09 PM
Exit mobile version