राशीभविष्य शुक्रवार, १५ मे २०२०

राशीभविष्य शुक्रवार, १५ मे २०२०

राशीभविष्य

मेष ःविरोध सहन करावा लागेल. तुमचा मुद्दा निकामी ठरवण्याचा प्रयत्न केला जाईल. जिद्द सोडू नका.

वृषभ ःआजच्या दिवसाचे काम वेळच्या वेळी करा. कामगारांच्या गैरसोयीची चौकशी करा. यशस्वी दिवस.

मिथुन ःप्रवासात घाई करू नका. वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी ठेवा. प्रेमाने बोला.

कर्क ःअपेक्षित माणसाची भेट झाल्याने तुमची समस्या सोडवता येईल. नातलगांचा सहवास मिळेल.

सिंह ःयोजनेला मार्गी लावता येईल. धंद्यातील येणे वसूल करा. नवे काम छोट्या कारणाने सोडू नका.

कन्या ःतुम्ही घेतलेले परिश्रम उपयोगी येतील. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. व्यवहार तपासा.

तूळ ःतुमच्या मनावर दुसर्‍याच्या बोलण्याचा परिणाम होईल. तटस्थ रहा. कमी बोलणे हिताचे असेल.

वृश्चिक ःआजचे काम आळसाने थांबवू नका. मेहनत घ्या. क्षुल्लक प्रश्नावर नको ती चर्चा कशाला.

धनु ःतुमच्या वागण्याची बदललेली पद्धत सर्वांच्या लक्षात येईल. मुलाच्या प्रगतीने मन भरून येईल.

मकर ःसामाजिक प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल. कोर्टाचे काम संपवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ ःथकवा वाटेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल.

मीन ःसकाळचे काम आजच करा. चर्चा यशस्वी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.

First Published on: May 15, 2020 1:36 AM
Exit mobile version