राशीभविष्य गुरुवार, २० जून २०१९

राशीभविष्य गुरुवार, २० जून २०१९

राशीभविष्य

मेष ः- ठरविलेले काम पूर्ण कराल. तुमच्या विचारांना इतरांची सहमती मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ ः– कोर्टाच्या कामात यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. उत्साह वाढवणारी घटना घडेल.

मिथुन ः– डोळ्यांची काळजी घ्या. विरोधकांचा सामना करावा लागेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

कर्क ः– वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाकडी वाट धरू नका. सहनशीलता ठेवा.

सिंह ः– रागाच्या भरात चांगले संबंध बिघडू शकतात. किरकोळ अडचण येईल. रस्त्याने सावधपणे चालावे.

कन्या ः– घरातील व्यक्तींसाठी स्वतःचे काम बाजूला ठेवाल. नवीन कामाचा प्रयत्न करता येईल.

तूळ ः– किरकोळ मतभेद घरात होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक ः– आत्मविश्वासाने प्रश्न सोडवता येईल. ओळखीमुळे काम चांगल्या पद्धतीने करून घेता येईल.

धनु ः– धंद्यात प्रगती करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वरिष्ठ खूश होतील.

मकर ः– विरोधकांचे मत ऐकून घ्यावे लागेल. हातघाईवर येऊ नका. वाहन हळू चालवा.

कुंभ ः– धंद्यात लक्ष द्या. नोकरवर्ग त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामान्य अडचणींवर मात करावी लागेल.

मीन ः- पदाधिकार मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कोर्टाचे कामात प्रतिष्ठा वाढेल.

First Published on: June 20, 2019 1:04 AM
Exit mobile version