राशीभविष्यः गुरुवार ०२ डिसेंबर २०२१

राशीभविष्यः गुरुवार ०२ डिसेंबर २०२१

राशीभविष्य

मेष :- अडथळे व अडचणी आल्यातरी शेवटी काम होण्याचे चिन्ह दिसेल. राग वाढू देऊ नका. वाहन हळू चालवा.

वृषभ :- दिलेला शब्द समोरची व्यक्ती पाळेल या भरवशावर राहू नका. स्वतःचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. धंद्यात तणाव संभवतो.

मिथुन :- ‘रात गई बात गई’ हे धोरण ठेवल्यास उशिरा का होईना तुमच्या कामाला सुरुवात होईल. समजूतदारपणा ठेवावा लागेल.

कर्क :- तर्क वितर्क त्रासदायक ठरेल. स्वतःच्या चुका शोधल्यास दुसर्‍याला दोष देण्याचे कारण उरणार नाही.

सिंह :- यश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल. विचारांना चालना मिळेल. कलात्मक दृष्टीकोण उपयोगी पडेल.

कन्या :- मत एकाग्र झाल्याने ताणतणाव कमी झाल्याचा अनुभव येईल. ईश्वरी आराधना उपयोगी पडेल.

तूळ :- दृढ निश्चयाने काम करता येईल. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. उत्साह वाढेल. धंदा तेजीत राहील.

वृश्चिक :- व्यवसायात फायदा होईल. मनाची चंचलता दूर करण्याचा प्रयत्न करा. खूशखबर मिळेल.

धनु :- उत्साहाला नियंत्रित ठेवा. खाण्यावर बंधन ठेवा. ईश्वरी चिंतनावर विश्वास ठेवल्यास औदासीन्य येणार नाही.

मकर :- तुमच्या विचारांची दिशा योग्य असली तरी आज मात्र तुम्हाला तडजोडीचे धोरणच यश देईल.

कुंभ :- नियोजनबद्ध काम करा. व्यवसायात लाभ होईल. वरिष्ठांच्या चुका शोधू नका. संधी सोडू नका.

मीन :- यश समोर दिसेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. क्षुल्लक कारणाने निराश होऊ नका. मनाची एकाग्रता ठेवा.

First Published on: December 2, 2021 1:04 AM
Exit mobile version