मेष : तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मैत्रीमुळे समस्येतून मार्ग मिळेल.
वृषभ : महत्त्वाचे काम करून घ्या. कठीण काम एखाद्या व्यक्तीच्या मदतीने होऊ शकेल. कलेत मन रमेल
मिथुन : वरिष्ठांच्या मतानुसार काम करावे लागेल. कामाचा व्याप वाढेल. दगदग होईल.
कर्क : नोकरीत काम करताना एकाग्रता ठेवा. आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रेमाला चालना मिळेल.
सिंह : प्रवासात घाई करू नका. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. रागावर ताबा ठेवा.
कन्या : मुलांची प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल. आजचे काम आजच करून घ्या.
तूळ : काम करताना मन एकत्र करा. चूक होऊ शकते. शेजार्याला मदत करावी लागेल.
वृश्चिक : अडचणीतून मार्ग काढणारा माणूसच प्रगती करू शकतो. नम्रता ठेवा. नवीन ओळख होईल.
धनु : धंद्यात प्रगतीकारक घटना घडेल. गोड बोलण्यावर जास्त भाळून जाऊ नका. प्रसिद्धी मिळेल.
मकर : विचारांना दिशा मिळेल. तुमचा उपयोग झाल्याने मित्रपक्ष तुमचे कौतुक करतील.
कुंभ : मनावर दडपण येईल. तुमचा विचार सर्वांना पटणे कठीण आहे. प्रवासात घाई करू नका.
मीन : आजच्या कामात चांगले यश मिळेल. आळस करू नका. धंद्यात फायदा होईल.