मेष : तुमच्या कार्याला चांगले वळण मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. जवळच्या लोकांना प्रेमाने बरोबर घ्या.
वृषभ : प्रवासात सावध रहा. वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा कठीण आहे.
मिथुन : घरातील कामे होतील. सर्वांना खूश ठेवता येईल. धंद्यात चांगला जम बसेल. वसुली करा.
कर्क : वाटाघाटीचा प्रश्न सोडवणे थोडे कठीण वाटेल. दगदग वाढेल. थकवा जाणवेल.
सिंह : आजचे काम लवकर पूर्ण करा. सर्वांचे सहकार्य उत्तम राहील. ठरवाल ते कराल.
कन्या : तुमचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. मैत्री वाढेल.
तूळ : प्रेरणादायी घटना घडेल. भावना व व्यवहार नीट सांभाळा. गुप्तता ठेवा.
वृश्चिक : तुमचे मन स्थिर राहील. प्रतिष्ठित काम करण्याची संधी मिळेल. अंदाज घेता येईल.
धनु : विचारांना चालना मिळेल. स्पर्धा जिंकाल. प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल.
मकर : क्षुल्लक कारणाने तुमची चिडचिड होईल. वडीलधार्यांना कमी लेखू नका. सहनशीलता ठेवा.
कुंभ : महत्त्वाची कामे वेळच्या वेळी करून घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. नवे काम मिळेल.
मीन : तुमचा उत्साह कठीण काम करण्यास उपयोगी पडेल. वाटाघाटीत यश मिळेल. वसुली करा.