राशीभविष्य : बुधवार,२८ एप्रिल २०२१

राशीभविष्य : बुधवार,२८ एप्रिल २०२१

राशीभविष्य

मेष :- धाडस वाढेल. नव्या विचाराने प्रेरीत व्हाल. डावपेच टाकता येईल. भेट घेण्यास व चर्चा करण्यात यश मिळेल.

वृषभ :- धंदा मिळेल. किरकोळ वाद भागीदाराबरोबर होऊ शकतात. थकवा वाटेल. धावपळ होईल.

मिथुन :- वरिष्ठांना सांभाळून घ्यावे लागेल. धंद्यासाठी नवा विचार सुचेल. मित्रांचा सहवास मिळेल. प्रवासात ओळख वाढेल.

कर्क :- प्रतिष्ठा टिकवता येईल. धंद्यात नोकरवर्गाला त्रास होऊ शकतो. कोर्ट केसमध्ये बोलताना काळजी घ्या.

सिंह :- घरातील मतभेद मिटवता येतील. वरिष्ठांना तुमचे मत पटवून देता येईल. तुमचा दिवस चांगला असेल.

कन्याः- नित्य नियमाचा क्रम व्यवस्थित पार पाडता येईल. अधिकाराचा उपयोग करून घेता येईल.

तूळ :- आजचे काम आजच करून घ्या. धंदा मिळेल. स्पर्धा आकर्षक झाल्याने उत्साह वाढेल. प्रवास घडेल.

वृश्चिक :- नवा विचार धंद्यात उपयोगी पडेल. नावलौकिक मिळेल. वरिष्ठ व सहकारी तुमची मदत करतील.

धनु :-आक्रमक पवित्रा राजकीय-सामाजिक क्षेत्रात घेता येईल. कामात यश मिळेल. प्रयत्नांना चालना मिळेल.

मकर :- आजच्या दिवसात मन उदास राहील. कोणताही क्षेत्रात मत व्यक्त करताना काळजी घ्या. फायदा होईल.

कुंभ :- कामाचा व्याप सांभाळून घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटीत महत्वाची बातमी मिळेल. खरेदी कराल.

मीन :-तुमचे वर्चस्व सामाजिक क्षेत्रात वाढेल. धंद्यात चांगला फायदा होईल. पाहुण्यांच्यासाठी खर्च करावा लागेल.

First Published on: April 28, 2021 1:11 AM
Exit mobile version