राशीभविष्य सोमवार, ११ मे २०२०

राशीभविष्य सोमवार, ११ मे २०२०

राशीभविष्य

मेष ःस्पष्ट बोलण्यापेक्षा काही गोष्टी युक्तीने सांगाव्या लागतात तरच त्या पटतात. प्रेमाने बोला. धंदा मिळवा.

वृषभ ःअपरिचित व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. महत्त्वाचा फोन येईल.

मिथुन ःआजचे काम ठरविल्याप्रमाणे होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठांचा सहवास मिळेल.

कर्क ःविरोधक मैत्री करण्यास तयार होतील. कठीण काम करून दाखवता येईल. धंद्यात वाढ होईल.

सिंह ःमनस्ताप देणारा फोन येण्याची शक्यता आहे. पाहुण्यांसाठी जास्त काम करावे लागेल.

कन्या ःआजचे काम उद्यावर टाकू नका. घरातील माणसांना प्रेमाने वागवा. वाटाघाटी कराव्या लागतील.

तूळ ःआवडत्या विषयात मन रमेल. धंद्यात वाढ होईल. परिश्रम घ्या. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ःधंद्यासाठी केलेली धावपळ उपयोगी पडेल. ओळखीचा फायदा होईल. डोक्याने काम करा.

धनु ःदगदग होईल. थकवा वाढेल. घरातील कामे करण्याचा विचार होईल. उद्या उत्साह वाढेल.

मकर ःआजचे काम आजच करून घ्या. थकबाकी वसूल करा. धंद्यात नवा विचार करावा लागेल.

कुंभ ःकारणाशिवाय कधी कधी डोक्याला त्रास होत असतो. फोन आल्याने मन विचलीत होईल. संयम ठेवा.

मीन ःआजच्या कामात चांगले यश मिळेल. उद्यावर जास्त भरवसा ठेऊ नका. आज करे सो अभी कर.

First Published on: May 11, 2020 1:03 AM
Exit mobile version