राशीभविष्य बुधवार, २२ एप्रिल २०२०

राशीभविष्य बुधवार, २२ एप्रिल २०२०

मेष ःविरुद्धलिंगी व्यक्तीचा डाव ओळखा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. धंद्यात मोठा फायदा होऊ शकतो.

वृषभ ःमहत्त्वाचे काम आजच करून घ्या. कोर्टकेसमध्ये नम्रतेने बोला. समस्या वाढणार नाही.

मिथुन ःदुसर्‍यांच्या रागाचा तुम्हाला त्रास होईल. प्रेमाच्या व्यक्तीला सांभाळून घ्या. स्पर्धेत चमकाल.

कर्क ःआजचे काम आजच करणे याला तत्परता म्हणतात. नावलौकिक मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

सिंह ःक्षुल्लक गोष्टींच्या बोलण्याचा मनावर ताण येईल. दडपण वाढेल. कामाचा व्याप वाढेल.

कन्या ःधंद्यात वाढ होईल. वरिष्ठांबरोबर गोड बोला. तुमचा महत्त्वाचा प्रश्न सोडवा.

तूळ ःतुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वाहन जपून चालवा. कलाक्रीडासाहित्यात चमकाल.

वृश्चिक ःविचारांना दिशा मिळेल. मोठ्या लोकांची मदत धंद्यात घेता येईल. नवीन ओळख होईल.

धनु ःमुलांची प्रगती पाहून सुख वाटेल. नवीन खरेदी कराल. मोठे लोक मदत करतील.

मकर ःआजचे काम उद्यावर टाकू नका. मानप्रतिष्ठा मिळेल. कठीण काम करून घेता येईल.

कुंभ ःतुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. आवडते काम करण्यात मन रमेल.

मीन ःजुना वाद मिटवता येईल. नवीन धंदा मिळेल. धंद्यात अंदाज बरोबर येईल. प्रतिष्ठा मिळेल.

First Published on: April 22, 2020 1:24 AM
Exit mobile version