राशीभविष्य: सोमवार, ८ नोव्हेंबर २०२१

राशीभविष्य: सोमवार, ८ नोव्हेंबर २०२१

राशीभविष्य

मेष :- नव्या विचाराकडे मन जाईल. त्यामुळे मनावरील दडपण कमी होईल. प्रेम प्रकरणाला चालना देणारी घटना घडेल. धंद्यात फायदा होईल.

वृषभ :- मनाची चंचलता वाढेल. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी होणारा विलंब नकोसा वाटेल. नाटकी प्रेमाचा कंटाळा येईल.

मिथुन :- समोरच्या व्यक्तीचे डावपेच समजून येतील. रागाचा अतिरेक होण्याची शक्यता आहे. खरेदी करताना काळजी घ्या. फसगत संभवते.

कर्क :- दूर गेलेली व्यक्ती पुन्हा नव्याने सहवासात येण्याची शक्यता आहे. राजकारणात आशेची किरणे दिसतील.

सिंह :- तुमच्या मनातील सुप्त सुडाचा तुम्ही फायदा उठविणयाचा प्रयत्न कराल. भावनेला आवर घालणे अशक्य होईल. मोठी खरेदी कराल.

कन्या :- कष्टाला यशाचे फळ लागले यामुळे सुखाऊन जाल. सासरची मंडळी तुमचे कौतुक करतील. मुलांच्या हितासाठी झटाल.

तूळ :- हौस-मौज करण्याचा मूड येईल. भटकंती केल्याने शरीर व मन उत्साही होईल. औषधाची वेळ मात्र चुकवू नका.

वृश्चिक :- प्रवाहाच्या विरुद्ध जाऊनही यश मिळवून दाखवण्याची जिद्द ठेवाल. प्रेम भावना प्रभावित होतील. चांगल्या व्यक्तींचा सहवास मिळेल.

धनु :- शत्रूला प्रेमाने जिंकावे व प्रेमाला प्रामाणिकपणे दाद द्यावी अशी तुमची भावना असते. विरोध होईल. तटस्थ रहा. प्रश्न मिटेल.

मकर :- मुलांच्या बद्दलचा एखादा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मिळेल. दूरच्या प्रवासाचा आनंद लुटता येईल. उत्साह वाढेल.

कुंभ :- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक ठरतो. कला क्षेत्रात प्रगतीसाठी मोठ्या व्यक्तींना भेटा. भावनाविवश होऊ नका.

मीन :- अपूर्ण राहिलेला व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील. व्यवहार व भावना यांची गल्लत करू नका.

First Published on: November 8, 2021 7:09 AM
Exit mobile version