राशीभविष्य: सोमवार 29 ऑगस्ट 2022

राशीभविष्य: सोमवार 29 ऑगस्ट 2022

मेष : क्षुल्लक कारणाने एखादे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. घरात वाद होईल. आपसात गैरसमज होतील.

वृषभ : अडचणी कमी झाल्याने सरकार दरबारीची कामे करता येतील. नोकर माणसे त्रास देण्याची शक्यता आहे.

मिथुन : अपेक्षित व्यक्तीची मदत मिळणे थोडे कठीण होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. जुने स्नेही भेटतील.

कर्क : मुलांची प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठांना तुमची मदत महत्त्वाची ठरेल. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा.

सिंह : अपमानास्पद घटना घडण्याची शक्यता आहे. अचानक कामात बदल करण्याची वेळ येईल.

कन्या : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. नवीन परिचय फायदेशीर व उत्साहवर्धक ठरेल. धंदा वाढेल.

तूळ : राजकीय-सामाजिक कार्यात प्रगती होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. थकबाकी वसूल करा.

वृश्चिक : तणाव कमी होईल. वरिष्ठांबरोबर झालेला वाद मिटेल. प्रवासात घाई करू नका. नम्र राहा.

धनु : घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ होईल. स्वतःचे काम वाढेल. कामात बदल होऊ शकतो.

मकर : आज महत्त्वाचा निर्णय घेता येईल. मान-सन्मान मिळेल. स्पर्धा जिंकाल. धंदा वाढेल. मित्र भेटतील.

कुंभ : अचानक कुणी आल्याने तुमचा वेळ फुकट खर्च होईल. शेजारी एखादी तक्रार करेल. पोटदुखी होऊ शकते.

मीन : आज ठरविलेले काम आजच पूर्ण करा. उद्या अडचण येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांना खूश करता येईल.

First Published on: August 29, 2022 5:40 AM
Exit mobile version