मंगळ-शनि ग्रहाचा षडाष्टक योग; ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींसाठी त्रासदायक काळ

मंगळ-शनि ग्रहाचा षडाष्टक योग;  ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींसाठी त्रासदायक काळ

ज्योतिष शास्त्रानुसार, 10 मेपासून मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला असून कुंभ राशीत असलेल्या शनीमुळे ‘षडाष्टक योग’ तयार होत आहे. जो 1 जुलै 2023 पर्यंत असेल. मंगळ आणि शनिमुळे 30 वर्षांनंतर षडाष्टक योग तयार होत आहे. हा षडाष्टक योग ज्योतिष शास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या भावात असताना तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. यावेळी मंगळ कर्क राशीत आणि शनि कुंभ राशीत असल्यामुळे षडाष्टक योग तयार झाला आहे. या योग पुढील काही दिवस या राशींसाठी त्रासदायक ठरू शकतो.

कर्क

शनि आणि मंगळामुळे तयार झालेला षडाष्टक योग कर्क राशीच्या लोकांना त्रासदायक ठरु शकतो. या लोकांना मतभेद किंवा वादाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या. मालमत्तेशी संबंधित वादही होऊ शकतात.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अडचणी देऊ शकतो. या लोकांच्या आयुष्यात तणाव वाढू शकतो. भावा-बहिणीशी वाद होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

धनु

या योगामुळे धनु राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिकांनीही सावध पावले उचलावीत कारण अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता कमी आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसातीही चालू आहे. मंगळ आणि शनिमुळे तयार झालेला षडाष्टक योग तुमचा तणाव आणि क्रोध वाढवू शकतो. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या.


हेही वाचा :

30 मेपासून ‘या’ 4 राशींसाठी सोन्याचे दिवस

First Published on: May 11, 2023 3:06 PM
Exit mobile version