Surya Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण? या राशींवर होणार ग्रहणाचा परिणाम

Surya Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण? या राशींवर होणार ग्रहणाचा परिणाम

सूर्यग्रहण तेव्हा लागते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जातो. हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला महत्त्वपूर्ण मानले जाते. 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण लागणार आहेत ज्यात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असतील. असं म्हटलं जातंय की, वर्षातील पहिले सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असेल ज्याला ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते.

कधी आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण?

यंदा वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी असणार आहेत. हे सकाळी 07:04 पासून दुपारी 12:29 पर्यंत असेल. मात्र, हे भारतात दिसणार नाही. या ग्रहणाचा प्रभाव ऑस्ट्रेलिया, फिलीपिंस, न्यूजीलँडमध्ये होईल.

‘या’ राशींवर होणार ग्रहणाचा परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहणाचा प्रभाव राशींवर देखील होतो. सूर्य देव या दिवशी मेष राशीमध्ये असतील. मेष राशी सूर्य देवांचा विशेष प्रभाव असतो, त्यामुळे या काळात मेष राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

सिंह राशीवर देखील ग्रहणाचा प्रभाव पाहायला मिळेल. शिक्षण आणि करिअरमध्येअडचणी निर्माण होतील.

कन्या राशींच्या व्यक्तींना मानसिक कष्ट सहन करावे लागेल. या काळात या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे.

2022 मध्ये दिसले होते शेवटचे सूर्यग्रहण

2022 मधील शेवटचे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर रोजी अश्विन अमावस्येला दिसले होते. या दिवशी दिवाळीचा सण देखील होता. हे ग्रहण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील दिसले होते.


हेही वाचा :

कमी मेहनत, जास्त पैसा कमावणारे ‘या’ आहेत 4 भाग्यशाली राशी

First Published on: February 7, 2023 4:28 PM
Exit mobile version