IPL 2020: ‘या’ कारणासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी बांधली होती काळी पट्टी

IPL 2020: ‘या’ कारणासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी बांधली होती काळी पट्टी

दुबईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचा पहिला क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीला धूळ चारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दरम्यान, या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी लावली होती. ही काळी पट्टी नेमकी का लावली होती? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा मध्यमगतीचा गोलंदाज मोहित शर्माच्या वडिलांचे क्वालिफायर सामन्यापूर्वी निधन झाले. मोहित शर्माचे वडील महिपाल शर्मा यांना श्रद्धांजली देण्यासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी सामन्यादरम्यान दंडावर काळी पट्टी बांधली होती. दरम्यान, वडिलांच्या निधानामुळे मोहित शर्माला अचानक भारतात परतावे लागले. ३२ वर्षीय मोहित शर्मा १३ व्या हंगामात फक्त एक सामना खेळला आहे. या सामन्यात मोहित शर्माला फक्त एक विकेट मिळाली आहे. मोहितने ८६ आयपीएल सामन्यात ९२ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, याआधी २२ ऑक्टोबरला पंजाबचा खेळाडू मनदीप सिंगच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधत श्रद्धांजली वाहिली होती.

दरम्यान, पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने दिल्लीला पराभत केले. या सामन्यात दिल्लीने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत निर्धारित २० षटकांत २०० धांवाचा डोंगर उभा केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांसमोर दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबईने दिल्ली हरवत सहाव्यांदा अंतिम फेरित प्रवेश केला आहे.


हेही वाचा – IPL 2020: फायनलपूर्वी मुंबईच्या गोटात चिंता; प्रमुख गोलंदाज जायबंदी


 

First Published on: November 6, 2020 4:45 PM
Exit mobile version