सकाळी उठल्यानंतर कधीही करु नका ‘या’ 5 चुका

सकाळी उठल्यानंतर कधीही करु नका ‘या’ 5 चुका

रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण अशा अनेक चुकीच्या गोष्टी करत असतो ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. या सवयी आपल्याला हळूहळू नकारात्मक आणि अधिक चिडखोर बनवतात. त्यामुळे घर किंवा ऑफिसमधील लोकांशी असलेले संबंध खराब होऊ लागतात. आज तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण करत असलेल्या अशाच 5 वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही सोडल्यास तुमचा दिवस नक्कीच चांगला जाऊ शकतो.

पहिली वाईट सवय म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल चेक करणे. या वाईट सवयीमुळे आपले डोळे खराब होऊ शकतात. त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर थोडे कोमट पाणी प्या, हात धुवा, बाल्कनीमध्ये थोडावेळ चाला, किंवा खिडकीजवळ जा आणि ताज्या हवेत श्वास घ्या. स्वत:साठी एक किंवा दोन तास द्या.

अनेकजण सकाळी नाश्ता करत नाहीत. काहाही न खाता फक्त चहा किंवा कॉफीने दिवसाची सुरुवात करतात. मात्र, दिवसाची चांगली सुरवात करण्यासाठी निरोगी नाश्ता करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, टोस्ट, ताजी फळे खाऊ शकता.

सकाळी उठल्यानंतर आधी तुमच्या दिवसाचे नियोजन करणे (प्लॅन करणे) आणि नंतर कामाला सुरुवात करणे खूप गरजेचे आहे.

रोज सकाळी अंघोळ केल्यानंतरच कामासाठी बाहेर जाणे आवश्यक आहे, कारण यामुळे दिवसभर फ्रेश वाटते आणि नवी ऊर्जा निर्माण होते. आंघोळ केल्याने आपल्या शरीरात चांगले हार्मोन्स रिलीज होतात आणि हेच हार्मोन्स आपल्याला हाय परफॉर्मेंससाठी तयार करतात.

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक गोष्टी किंवा अडचणींचा अजिबात विचार करू नका. मेडिटेशन करा यामुळे तुमचा उत्साह वाढेल. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आनंदी रहा. आशा कधीही सोडू नका. कारण सकाळी लवकर मनात येणारा नकारात्मक विचार तुम्हाला नेहमी निराश करतो.


हेही वाचा : 

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील ‘या’ टिप्स येतील कामी

First Published on: October 14, 2023 6:00 PM
Exit mobile version