आयुर्वेदानुसार फ्रुट शेक पिणं धोक्याचं

आयुर्वेदानुसार फ्रुट शेक पिणं धोक्याचं

आपल्या निरोगी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. सकस आणि चौकस आहार घेतल्याने त्या पदार्थांमधील पोषकतत्व शरीरासाठी उपयुक्त ठरतात. अलीकडच्या काळात काहीजण मोठ्या प्रमाणावर फ्रुट शेकचे सेवन सुद्धा करतात. फ्रेट शेकचे सेवन कधी नाश्ता म्हणू तर कधी उन्हाळ्यापासून आराम मिळावा, थंडावा मिळावा म्हणून केले जाते. पण हे ‘फ्रुट शेक’ सतत प्यायल्याने आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

बऱ्याच वेळा लहान मुलांच्या आहारात सुद्धा या फ्रुट शेकचा समावेश केला येतो. पण आयुर्वेदानुसार हे शेक तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आयुर्वेदानुसार फळं आणि दूध यांचे मिश्रण अयोग्य

फळं आणि दूध यांचे एकत्र सेवन करणे आयुर्वेदाच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे सांगितले जाते. कारण फळं आणि दूध यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. तसेच ते एकमेकांविरोधी आहेत त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांचे सेवन केल्याने त्याचा पचन संस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी या सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचसोबत फळांमध्ये अनेक रासायनिक द्रव्य असतात जे दुधात मिळसल्याने त्याचा प्रकृतीवर चुकीचा परिणाम होतो.

मँगो आणि बनाना शेक का पिऊ नये?

मँगो शेक आणि बनाना शेक उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात प्यायले जाते. पण आंब्यामध्ये आम्ल आणि सायट्रिक ऍसिड असते आणि केळ्यामध्ये अनेक रासायनिक घटक असतात जे दुधामध्ये मिसळल्याने पचनाचा त्रास होतो. यामुळे पोटदुखी देखील होऊ शकते.


हेही वाचा : World Liver Day 2024: लिव्हर डिटॉक्ससाठी आहारात करावा या पदार्थांचा समावेश

First Published on: April 19, 2024 11:45 AM
Exit mobile version