ग्लॅमरस लूक कसा मिळवाल ?

ग्लॅमरस लूक कसा मिळवाल ?

फॅशन म्हटलं का ती ड्रेसिंगपासून ते चेहर्‍याच्या मेकअपपर्यंत करता येते. ड्रेसिंगनुसार चेहर्‍याचा मेकअप केल्याने एक वेगळा ग्लॅमरस लूक येतो. जो आपल्या फॅशनेबल ड्रेसनुसार सौंदर्य खुलवतो. हाच फॅशनेबल मेकअप करण्यासाठी बर्‍याच तरुणी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करतात. परंतु, पार्लरमध्ये जाण्यास देखील कधीकधी वेळ नसतो. मात्र सुंदर देखील दिसायचे असते. अशावेळी घरच्याघरी मेकअप करुन तुम्ही सुंदर दिसू शकता. चला तर जाणून घेऊया घरच्याघरी फॅशनेबल मेकअप कसा करावा? ज्यामुळे तुमचा चेहरा खुलून दिसण्यास मदत होईल.

फेअरनेस क्रिम

मेकअप करण्याआधी सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर चेहर्‍यावर फेअरनेस क्रिम लावावी. यामुळे चेहर्‍याला एक वेगळा लूक येतो. असे फेअरनेस क्रिम वापरावे ज्यामध्ये SPF चा देखील समावेश असेल. यामुळे उन्हात बाहेर पडल्यास चेहर्‍याचे संरक्षण देखील होण्यास मदत होईल.

कॉम्पॅक्ट पावडर

फेअरनेस क्रिम लावल्यानंतर त्यावर एखाद्या चांगल्या दर्जाची कॉम्पॅक्ट पावडर लावावी. यामुळे तुमचा चेहरा उठून दिसण्यास मदत होते. तसेच कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने चेहर्‍यावर ऑइल येत नाही आणि चेहरा खूप वेळ फ्रेश देखील राहतो.

ब्लश आणि हाइलाइटर

फेअरनेस क्रिम आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर ब्रश आणि हाइलाइटर गालावर फिरवावा. यामुळे चेहर्‍याला एक वेगळी चमक येते आणि चेहर्‍याला एक वेगळा ग्लो येतो.

मस्करा आणि लायनर

मेकअप पूर्ण करण्यासाठी डोळ्यांना लायनर आणि मस्करा लावावा. डोळ्यांना लायनर आणि मस्करा लावल्याने डोळे उठून आणि आकर्षित दिसण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांच्या पापण्यांना मस्करा आणि डोळ्यांना लायनर लावावे.

लिपस्टिक

संपूर्ण मेकअप झाल्यानंतर ओठांना लिप बाम लावल्यानंतर त्यावर लिपस्टिक लावावी. तुम्हाला आवडेल ती शेड लावाली. यामुळे चेहरा अधिक खुलून दिसण्यास मदत होते.

अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करून चेहर्‍याचा मेकअप केला जातो. मात्र हा मेकअप काढताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. मेकअप काढण्यासाठी अनेक वेळा साबणाचा वापर केला जातो. परंतु, मेकअप काढण्यासाठी साबणाचा वापर करू नये. मेकअप काढण्यासाठी क्लिंजिंग मिल्क, बेबी ऑईल आणि वेट टीशूचा वापर करावा. यामुळे चेहर्‍याला कोणताही अपाय होत नाही. – संकेत शिंदे, मेकअप आर्टिस्ट

First Published on: September 23, 2018 12:34 AM
Exit mobile version