PCOD च्या समस्येमध्ये योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक

PCOD च्या समस्येमध्ये योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली आवश्यक

पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणजेच PCOD ही आजच्या काळात मोठी समस्या बनलीये. अनेक महिला या समस्येतून जात आहेत. हा हार्मोनल विकार आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बळी पडत आहेत. याचा परिणाम पीरियड्सवरही होतो. याशिवाय पीसीओडीच्या समस्येमुळे महिलांना गरोदरपणातही समस्यांना सामोरे जावे लागते. पीसीओडीचा परिणाम शरीराच्या वजनावरही दिसून येतो. PCOD (Polycystic Ovarian Disease)

या समस्येमुळे अशक्तपणा देखील सामान्य आहे. या रोगामुळे, अंडाशयात लहान गुठळ्या तयार होऊ लागतात. हार्मोनल असंतुलनामुळे महिलांमध्ये भावनिक बदलही होऊ लागतात. या समस्येमुळे त्यांना भावनिक आव्हानांनाही सामोरे जावे लागते. जेव्हा PCOD ची समस्या असते तेव्हा आहारावर लक्ष केंद्रित करणे खूप महत्वाचे होते.

तुमच्याही मनात असा प्रश्न असेल की पीसीओडीची समस्या निरोगी जीवनशैली आणि योग्य आहाराने दूर करता येईल का?

निरोगी आहार आणि पीसीओडी

पीसीओडी व्‍यवस्‍थापित करण्‍यात सकस आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा परिस्थितीत तुमचा आहार संतुलित असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आहारातून साखर आणि कार्ब्स कमी करा. त्याचबरोबर आहारात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढवा. तुमच्या आहाराचा तुमच्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. योग्य आहारामुळे जळजळ कमी होते आणि PCOD च्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होते.

आहार कसा असावा?

First Published on: July 7, 2023 12:00 PM
Exit mobile version